
मुंबई गोवा महामार्गावर टोलमाफी द्या …! महामार्ग जनआक्रोश समितीची आग्रही मागणी.
- रत्नागिरी : प्रमोद तरळ :- गेल्या १७ वर्षांपासून मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणातील जनतेला अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.
- अपूर्ण रस्ते, खड्डे, अपूर्ण पूल, सततची वाहतूक कोंडी आ णि अपघातांची भीती यामुळे हजारो नागरिकांचे हाल झाले आहेत.
- या काळात लोकांचा अमूल्य वेळ वाया गेला, इंधनाचा अ तिरिक्त खर्च झाला आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुक सानही सहन करावे लागले.
- जनतेने एवढा मोठा त्रास सहन करूनही आता पुन्हा टोल च्या नावाखाली पैसे उकळले जाणे हे अजिबात मान्य होणार नाही.

- मुंबई गोवा महामार्गावर टोलमाफीच द्या अशी ठाम माग णी महामार्ग जनआक्रोश समितीने शासनाकडे केली आहे.
- जर करारानुसार टोल भरावाच लागत असेल तर तो सर कारने स्वतःच्या निधीतून भरावा जनतेवर हा अन्यायका रक बोजा टाकू नये.
- हा प्रश्न केवळ काही लोकांचा नाही, तर संपूर्ण कोकणा तील जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे.
- त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार ते मंत्री अशा सर्व लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन या मागणी साठी ठाम आवाज उठवावा.
- अन्यथा ज्या दिवशी टोल सुरू होईल त्या दिवशी टोल नाक्यावर गाड्या उभ्या करा आणि एकानेही टोल भरू नका.
- काम वेळेत केले असते तर प्रकल्पाचा बोजा इतका वाढ ला नसता. सरकारच्या चुकीचा त्रास कोकणकरांनी का सहन करावा…?
- प्रत्येक कोकणकर १७ वर्षांचा त्रास विसरणार नाही अन्या यकारक टोल आम्हाला मान्य नाही असे महामार्ग जनआ क्रोश समितीने म्हटले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











