परंडा येथील संगम पार्कमध्ये रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- दि. 16 मार्च 2026 – पवित्र रमजान महिन्यानिमित्त परंडा शहरातील संगम पार्क येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.
  • या कार्यक्रमाला संगमपार्क मधील विविध धर्मीय बांधवां नी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक ऐक्य आणि बंधुभावा चे दर्शन घडवले. कार्यक्रमाची सुरुवात कुरआन पठणाने झाली.
  • उपवास (रोजा) सोडण्याच्या वेळी उपस्थितांनी एकत्र येऊ न इफ्तार घेतला. या प्रसंगी खजूर, फळे, शरबत व विविध खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती.
  • या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील नगरप रिषदेचे नगरसेवक राहुल बनसोडे, फुले शाहू आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉ.शहाजी चंदनशिवे प्रा शंकर कुटे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक बाबासाहेब शिरसाग र नगरसेवक इस्माईल कुरेश नगरसेवक असीम सौदागर बबन ब्रह्मराक्षस उत्तम माने भागवत दडमल शैक्षणिक सा माजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर,, युवक आणि नागरि क मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • उपस्थित मान्यवरांनी रमजान महिन्याचे महत्त्व सांगताना शांतता, सहिष्णुता आणि परस्पर आदर यांचे संदेश दिले.
  • आयोजकांनी सांगितले की, अशा कार्यक्रमांमुळे समाजात एकोपा वाढतो आणि विविध धर्मीय लोकांमध्ये सलोखा निर्माण होतो.
  • कार्यक्रमाचे आयोजन मुन्ना दखणी फैजुद्दीन चौधरी ईलाई बेसकर यांनी केले होते.
  • कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. शेवटी मुन्ना दखणी यांनी सर्वांचे आभार मानले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles