
नालासोपारा (प)कडील जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे महापौरांना मागण्यांचे निवेदन.
- प्रतिनिधी : नालासोपारा : प्रमोद तरळ :- दि. ४ मार्च २०२६ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नाला सोपारा पश्चिमतर्फे उपशहरप्रमुख श्री.कृष्णा दिनकर सावं त व त्यांच्या सहकाऱ्यांनी वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर श्री.अजीव पाटील यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली व नालासोपारा पश्चिम (प्रभाग क्र. १४) येथील नागरिकांच्या काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या.

- या बैठकीत विद्यार्थ्यांसाठी नालासोपारा पश्चिम (प्रभाग क्र. १४) येथे स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शांत व उत्तम वातावरण मिळावे.
- यासाठी सार्वजनिक ग्रंथालय-अभ्यासिका उभारणे, पाटण कर पार्क, रायन इंटरनॅशनल स्कूल जवळ VVMC ने आ धीच आरक्षित केलेल्या जागेत मुलांसाठी खेळाचे मैदान व ज्येष्ठ नागरिकांसाठी चालण्याचा व विश्रांतीचे गार्डन विक सित करणे,नालासोपारा पश्चिम स्टेशन रोडवरील गॅलेक्सी प्लाझा हॉटेल चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुत ळा उभारणे, पाटणकर पार्क सिग्नलच्या मध्यभागी छत्रप ती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणे, परिस रात सार्वजनिक स्वच्छतागृहांची मोठी कमतरता असल्या ने नागरिकांच्या सोयीसाठी नवीन स्वच्छतागृहांची उभार णी करणे, नालासोपारा पश्चिम (प्रभाग क्र.१४) चक्रधर नगर येथील सध्या ‘नाना नानी पार्क’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गार्डनला स्व. संतोष टेंबवलकर (माजी शहर प्रमुख – शिवसेना उबाठा) यांचे नाव देण्यात यावे.
- आदी विविध महत्त्वाच्या मागण्या यावेळी महापौर श्री अजीव पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मांड ण्यात आल्या.

- आम्ही विरोधी पक्षात असूनही जनतेच्या विकासासाठी व कल्याणासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असल्याचे शिवसे ना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नालासोपारा पश्चिम – प्रभा ग क्र. १४) यांच्या वतीने सांगण्यात आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











