
शेवरे गावातील शिमगा उत्सव उत्साहात साजरा.
- प्रतिनिधी : मंडणगड : प्रमोद तरळ :-तालुक्यातील शेव रे गावातील प्रसिद्ध असलेल्या नवसाला पावणारी जागृत देवी वरदान देवीचा शिमगा उत्सव उत्साहात पार पडला.
- फाल्गुण महिन्यातील दुसऱ्या होळीच्या दिवशी गावदेवी वरदान देवीची ढालकाठीची सहा दिवस गावोगावी मिरव णूक काढण्यात आली.

- गावोगावी भक्तगणांनी वरदान देवीच्या ढालकाठीचे दर्शन घेतले सुवासनींनी देवीचे खणा नारळाने ओटी भरली आ ठव्या होळीच्या दिवशी ढालकाठीला वाजत गाजत शेवरे गावात आणली गेली सतत दोन दिवस गावात शिमगा उत्सव साजरा करण्यात आला.
- आपली गावदेवी गावात आल्याने संपूर्ण गावभर आनंदाचे वातावरण पसरले होते महिलांनी ढालकाठीला खांद्यावर वाजत गाजत स्वागत केले.
- ढाल काठीला उभी हातावर घेऊन नाचवीताना बघण्यासा ठी आजूबाजूच्या खेडेगावातील भक्त जणांची अपार गर्दी झाली.
- शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबईकर चाकरमान्यां नी १०० टक्के उपस्थिती लावली खास आकर्षण म्हणजे यावर्षी वरदान देवीच्या नावे प्रसिद्ध झालेले यूट्यूब वरील गाणे गावा गावातून गाजले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











