
मौजे आंबवली ग्राम विकास मंडळाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा – २०२५ उत्साहात संपन्न.
- प्रतिनिधी : नालासोपारा : प्रमोद तरळ :- दि. १३ जुलै २०२५ रोजी आंबवली ग्राम विकास मंडळ, महिला मंडळ, मुंबई आणि अमर शक्ती क्रिकेट संघ व क्रीडा समिती आं बवली (ता.मंडणगड) यांच्या सहकार्याने “विद्यार्थी गुणगौ रव सोहळा- २०२५” अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
- कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे वरिष्ठ सल्लागारश्री. दौलत खांबे होते. मंडळाचे शिल्पकार श्री.गणपत बाबा, अध्यक्ष रवीन्द्र रटाटे आणि सर्व कार्यकारिणी उपस्थितीत होती.

- सत्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी शि क्षक श्री.जगन्नाथ कोल्हे गुरुजी आणि श्री.हरिभाऊ डंबे गुरुजी सहपरिवार उपस्थित होते.
- त्यांनी अथक अनुक्रमे १२ /६ वर्षे जिल्हा परिषद आंबव ली शाळेसाठी योगदान दिले होते. जुन्या आठवणी ना उ जाळा देत त्यांनी विद्यार्थी आणि पालकवर्गाला उत्तम मार्गदर्शनाने कार्यक्रमाची शान वाढवली.
- यावेळी नर्सरीपासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या सर्व स्तरा तील विद्यार्थ्यांचा शाळोपयोगी साहित्य देऊन सन्मान करण्यात आला.
- विशेषतःजिल्हा तसेच राज्य पातळीवर क्रीडा क्षेत्रात उल्ले खनीय कामगिरी करणाऱ्या नेत्रा माळी हिला “प्रेरणा पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
- महिला मंडळातील सर्व महिलांना भेटवस्तू (वाण) देऊन पारंपरिक हळदीकुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आला.
- लहान मुलांसाठी आणि महिला मंडळ सदस्यांसाठी विवि ध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजनही करण्यात आले. उपस्थित आंबवलीकरांसाठी स्वादिष्ट स्नेहभोजनाची व्यवस्था होती.
- या सोहळ्याला ग्रामीण मंडळ, ग्रुप ग्रामपंचायत सरपंच त सेच मंडळाचे सर्व सभासद सहपरिवार उपस्थित होते.
- कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक मेहनत घेतली. हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











