
परांडा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; पक्षवाढीसाठी व संघटना मजबुतीसाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन.
- प्रतीनिधी : परंडा : फारूक शेख :- शिवसेना (उद्धव बा ळासाहेब ठाकरे) पक्षाच्या परांडा शहर व तालुका पदाधि काऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाप्रमुख रणजितदा दा ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज परांडा येथे उत्साहात पार पडली.
- आगामी काळातील संघटनात्मक कार्य, आगामी निवडणु कांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नियोजन आणि तळागाळाती ल पक्ष बांधणी यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

- या बैठकीला धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना लोकसभा सं पर्कप्रमुख सुनील काटमोरे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सौ. जिनत सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.
- बैठकीदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा च्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार, लोकसभा संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व शिवसै निकांना मार्गदर्शन केले.
- पक्षवाढीसाठी आवश्यक असले ल्या विविध उपक्रमांची माहिती देत त्यांनी कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लाग ण्याचे आवाहन केले.
- तर जिल्हाप्रमुख रणजितदादा ज्ञानेश्वर पाटील यांनी संघट ना मजबूत करण्यासाठी आणि तळागाळापर्यंत पक्षाची बांधणी करण्याबाबत उपस्थितांना गुरुकिल्ली दिली.
- आगामी काळातील संघटनात्मक कार्य, पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आलेली जबाबदारी आणि पक्षवाढीसाठीच्या नियोजनावर त्यांनी पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला.
- या बैठकीला परांडा शहर व तालुक्यातील शिवसेना (उद्ध व बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, आ जी-माजी लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






