
ताम्हाणे हायस्कूलचे मोतीराम कडू आदर्श लिपिक पुरस्काराने सन्मानित.
- प्रतिनिधी : ताम्हाणे : प्रमोद तरळ :- राजापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात येणाऱ्या आदर्श लिपिक पुरस्काराने माध्यमिक विद्यामंदिर ताम्हाणेचे लिपिक (क्लार्क) श्री मोतीराम अंतू कडू यांना गौरविण्यात आले.
- श्री.कडू हे ताम्हाणे कडूवाडीचे सुपुत्र असून त्यांची १ जुलै १९८६ मध्ये लिपिक म्हणून नेमणूक झाली तेव्हा शाळा विनाअनुदानित होती.

- ६ वर्षे त्यांनी विनावेतन काम केले ते ३९ वर्षे आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत.
- श्री कडू यांना रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्य मिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष श्री रामचंद्र केळ कर व माजी अध्यक्ष श्री गजानन पाटणकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











