
लांजा तालुक्यातील आसगे विद्यालयाच्या मदतीसाठी ५ एप्रिल रोजी पुणे येथे नमनाचा कार्यक्रम.
- प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :-तालुक्यातील उर्मिला माने विद्यालय आसगेच्या शैक्षणिक मदतीसाठी रविवार दि. ५ एप्रिल २०२६ रोजी सायं ५ वा. गणेश कला रंगमंच, स्वारगेट पुणे येथे बहुरंगी नमनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
- आसगे येथील उर्मिला माने विद्यालयाच्या मदतीसाठी प्र शालेचे माजी विद्यार्थी, पंचक्रोशीतील हितचिंतक आणि शिक्षणप्रेमी पुणे शहर यांच्यावतीने कोकणातील लोकप्रिय नमनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हे नमन नवयुग सेवा नमन मंडळ आसगे यांच्या वतीने सादर केले जाणार आहे.

- याकरिता केवळ रुपये शंभर तिकीट दर आकारण्यात आ ला असून विद्यालयाच्या आर्थिक मदतीसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला आपण सर्वांनी सहकार्य करावे.
- असे आवाहन श्री.नारायण धावडे, श्री.रामभाऊ बंडबे, श्री.सुरेश मांडवकर (संचालक – आसगे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, उर्मिला माने विद्यालय आसगे ता.लांजा) श्री.शांताराम सितप (अध्यक्ष – माजी विद्यार्थी संघ हितचिं तक कमिटी पुणे) श्री.रघुनाथ भारती (पुणे आसगे पंचक्रो शी ग्रामस्थ मंडळ), आणि श्री.शैलेश धावडे (प्रसिद्धी प्रमु ख पुणे माजी विद्यार्थी हितचिंतक कमिटी) यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






