
आमदार तानाजीराव सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; पाचपिंपळा येथे १० MVA ट्रान्सफॉर्मर दाखल….!
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील पाचपिंपळा आणि परिसरातील ७ गावांमधील कमी दाबा च्या विजेचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार आहे.
- राज्याचे आरोग्यमंत्री तथा आमदार तानाजीराव सावंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पाचपिंपळा येथील ३३ केव्ही सबस्टेशनसाठी १० MVA क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉ र्मर अखेर दाखल झाला आहे.
- यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

- कायमस्वरूपी वीज समस्या सुटणार
- गेल्या अनेक दिवसांपासून पाचपिंपळा पंचक्रोशीत वाढ त्या वीज मागणीमुळे नागरिकांना कमी दाबाच्या आणि खंडित वीजपुरवठ्याचा मोठा फटका बसत होता.
- यामुळे शेती कामात अडथळे येत होते, तसेच स्थानिक उ द्योजकांनाही नुकसान सहन करावे लागत होते.
- ही गंभीर समस्या लक्षात घेऊन नारायण खैरे, दिनकर खैरे आणि धनंजय खैरे यांनी आमदार तानाजीराव सावंत यांच्याकडे या प्रश्नासाठी पाठपुरावा केला होता.
- आमदारांनी महावितरण विभागाकडे तात्काळ संपर्क सा धून १० MVA चा उच्च क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर मंजूर करून घेतला.
- गावात जल्लोषात स्वागत व पूजन
- हा अवाढव्य ट्रान्सफॉ र्मर गावात दाखल होताच ग्रामस्थां नी फटाक्यांच्या अतिष बाजीसह त्याचे उत्साहात स्वागत केले.
- यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मरचे विधिव त पूजन करण्यात आले.
- नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे आता पाचपिंपळासह शेजारील गा वांना शेती आणि घरगुती वापरासाठी अखंडित व उच्च दाबाने वीज मिळणार आहे.
- मान्यवरांची उपस्थिती
- या प्रसंगी दिनकर खैरे, नारायण खैरे, धनाजी खैरे, हनुमंत खैरे, गुरुदास खैरे, बंडू खैरे, शिवाजी खैरे, दिनेश सांगडे, दत्ता धुमाळ, पांडुरंग खैरे, राजेंद्र खैरे, आसिफ शेख तसेच शिंदे साहेब आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
- या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल संपूर्ण पंचक्रोशीतून आमदार तानाजीराव सावंत यांचे आभार मानण्यात येत आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






