
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समानता व मानवी हक्कांसाठी संघर्ष केला – डॉ.शहाजी चंदनशिवे
- प्रतिनिधी : फारूक शेख :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यां नी आयुष्यभर सामाजिक समानता, न्याय आणि मानवी हक्कांसाठी अखंड संघर्ष केला, असे प्रतिपादन डॉ.शहा जी चंदनशिवे यांनी केले.
- ते कल्याण स्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्ष ण संस्था, परंडा येथे आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान कार्य क्रमात बोलत होते.

- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकां ना व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या या संस्थे मध्ये डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आ योजन करण्यात आले होते.
- या कार्यक्रमात डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी डॉ.आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

- यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालय, परंडा येथील उपप्राचार्य डॉ. महेश कुमार माने उपस्थित होते.
- त्यांनीही आपल्या मनोगतातून डॉ. आंबेडकर यांच्या विचा रांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली.
- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य के.जे.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास शिल्पनिदेशक म्हणून आर.डी.पवार, नितेश फाळके व एम. पी. काळे उपस्थित होते.

- तसेच संस्था व्यवस्थापन समिती सदस्य डॉ.संजय जाहीर दार, हिमालय वाघमारे व विशाल काशीद यांनीही उपस्थि ती दर्शवली.
- कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितेश फाळके यांनी केले, तर सूत्र संचालन आर. डी. पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनही आर.डी.पवार यांनी केले.

- या प्रसंगी संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा री मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






