
परंडा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी; डी.बी.ए. समूहाच्या वतीने शैक्षणिक साहित्य, गणवेश आणि घरगुती भांडी वाटप.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- येथील आठवडा बा जार चौकात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ‘डी.बी.ए. समूह’च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली.

- यावेळी महामानवाच्या प्रतिमेचे पूजन माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, माजी उपनगराध्यक्ष मतीन जिनेरी, खय्युम तुटके, दीपक गायकवाड, महेश कसबे, नासिर स य्यद आणि डी.बी.ए. समूहाचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्याची सुरुवात ध्वजारोहण आणि त्रिशरण पंच शील ग्रहण करून करण्यात आली. जयंतीचे औचित्य सा धून सामाजिक बांधिलकी जपत गरीब व होतकरू विद्या र्थ्यांना स्कूल बॅग, गणवेश आणि वह्या-पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
- तसेच, निराधार महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा च्या वतीने कामगारांना घरगुती भांडी संचाचे वाटप कर ण्यात आले.

- यावेळी नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले होते.

- कार्यक्रमाप्रसंगी महेश थोरबोले, अभिमान सुतार, डॉ. इज गज, नागेश डाके, धर्मराज नरोटे, दशरथ मारकड, प्रीतम ओव्हाळ, आनंद बनसोडे उपस्थित होते.

- या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती समितीचे अध्यक्ष दयानंद धेंडे, उपाध्यक्ष महावीर बनसोडे, बाळू बनसोडे, अल्लाउद्दीन शेख, कानिफनाथ सरपणे, सम्यक धेंडे, दत्ता त्रय पाटील तसेच आरती बनसोडे, कल्पना बनसोडे, सुष मा बनसोडे, संगीता बनसोडे, लक्ष्मी जाधव, सुशीला चौध री, सोनवणे मॅडम, गणिता गव्हाळे, रुक्मिणी चौधरी, राज श्री, उषा सुतार, शिल्पा चौधरी, प्राची बनसोडे व पत्रकार बांधवांनी परिश्रम घेतले.

- मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भीमसैनिकांनी व ना गरिकांनी या उपक्रमांचे कौतुक केले. शेवटी डी.बी.ए. स मूहाचे अध्यक्ष दयानंद बनसोडे यांनी सर्वांचे आभार मानले.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






