श्री.सिद्धिविनायक वधू वर सूचक केंद्राचे २१ वे कोकणस्थ कुणबी नोंदणी अभियान आणि मार्गदर्शन शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न.

  • प्रतिनीधी : प्रमोद तरळ :- रविवार दि. ५ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या २१ व्या नोंदणी अभियानाला कोकणस्थ कुणबी वधूवरांनी भरघोस प्रतिसाद देऊन नोंदणी अभिया न यशस्वी करण्यात आले.
  • या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून मंडणगड नगरपालिके च्या नगरसेविका बांधकाम सभापती सौ.राजश्री दिनेश सापटे मॅडम, श्री.दिनेश सापटे सर, कुणबी समाजोन्नती सं घ तालुका मंडणगड,श्री.शांताराम बैकर सर तालुका मंडण गड, तसेच सन्मा.शांतारामजी कुदळे साहेब, सेवानिवृत्त डेप्युटी सेक्रेटरी मंत्रालय, सामाजिक कार्यकर्ते श्री.संजय निवाते सर उपस्थित होते.
  • या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा श्री. सिध्दीविनायक वधूवर सूचक केंद्राच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
  • तसेच डॉ.ओमकार रबसे सर BAMS, डॉ.शरयु बैकर मॅड म MBBS या MD शिक्षणासाठी बाहेर गावी असल्याने श्री बैकर सर याचा सत्कार करण्यात आला.
  • वधूवरांचे प्रबोधन करताना श्री.बैकर सरांनी पत्रिका पाहून लग्न करणे चुकीची पद्धत असून याचे सोप्या भाषेत उदाहरण देऊन सांगितले.
  • श्रीम.स्ने.रा.मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय जैतापूरच्या प्रा ध्यापिका कु.शुभांगी बंडबे मॅडम यांनी उपस्थितांना मार्गद र्शन केले.
  • श्री.सुर्यकांत जोशी सर यांनी आमच्या केंद्राच्या माध्यमातू न कसे लग्न जमले याची माहिती दिली व आभार मानले.
  • संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. शिवराम जांभळे यांनी उप स्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.
  • श्री.सिद्धिविनायक वधूवर सुचक केंद्राच्या वतीने आज पर्यंत कोकणातील जिल्ह्यातील कुणबी इच्छुक वधूवरांची २१ यशस्वी नोंदणी अभियान आणि मार्गदर्शन शिबिरे संपन्न झाली असून त्याला समाज बांधव मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत.
  • या शिबिराच्या माध्यमातून नवीन नवीन स्थळे मिळवून वधूवरांना सुयोग्य, मनपसंत, जोडीदार मिळवून देण्याचे काम आम्ही करीत आहोत.
  • आजपर्यंत ४५ वर्षाच्या प्रवासात जवळजवळ हजारों यश स्वी विवाह जमले आहेत. याचे सर्व श्रेय माझ्या समाजबां धवांना असून मी फक्त निमित्त आहे.
  • या सामाजिक सेवेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग,रत्नागिरी, राय गड, ठाणे, पालघर, मुंबई, आणि मुंबई उपनगर या जिल्ह्या च्या प्रत्येक तालुक्यात पोहोचवलो आहोत.
  • लोक आग्रहास्तव आम्ही लवकरच २२ वे नोंदणी अभिया न आणि मार्गदर्शन शिबिर श्री सिद्धिविनायक वधूवर सुच क केंद्र ( रजि ) मुंबई यांच्यावतीने दि. सोशल सर्व्हिस शाळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड मुंबई ४०००१२ येथे आयोजित करत आहोत. नांवे नोंदणीसाठी श्री. शिवराम जांभळे 8928067597 / 9869507866 या नंबरवर संपर्क करावा.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles