
जश्ने गोसे आजम निमित्त आवाटी येथील वली बाबा दर्गा येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.
- प्रतिनिधी : करमाळा : मुजंम्मील पटेल :- करमाळा ता लुक्यातील आवाटी येथील हजरत चांद पाशा वली दर्गा येथे मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी जशने गो से आजम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दर्गा समितीचे अध्यक्ष कादर शेठ तांबोळी यांनी दिली.

- पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले की कार्यक्रमाची सुरु वात जीयारत मुए मुबारक आणि गिलाफे मुबारक (गौसे आज़म रजि.) व तोषेकी नियाज चा आणि लंगर खाणे (म हाप्रसाद ) चा कार्यक्रम सकाळी नऊ वाजल्यापासून दिव स रात्र चालू असतो या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी पर राज्यातील भक्त भाविकांची हजारोच्या संख्येने गर्दी होत असते.
- कार्यक्रमाकरिता आकर्षक विद्युत रोषणाई आणि मंडपाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दर्गा समितीचे अ ध्यक्ष तांबोळी यांनी दिली.

- या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन वलिबाबा यांचे खादीम ए खास गुलाम नबी कादरी, खादिम ए खास इर फान कादरी आणि सज्जादानशीन सुफी हसनैन कादरी तसेच दर्गा ट्रस्टचे सदस्य यांनी आवाहन केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






