
खाजगी शाळांची दादागिरी थांबणार…! पाठ्यपुस्तके शालेय साहित्य गणवेश खरेदीसाठी पालकांना वेठीस धरणाऱ्या खाजगी शाळांना यापुढे शिक्षणाच्या नावाखाली शालेय साहित्य विक्रीचा धंदा करता येणार नाही.
- प्रतिनीधी : नितीन राने :- सेल्फ फायनान्स शाळा पाल कांना शिक्षणाच्या नावाखाली लुटत असल्याची तक्रार आ युक्त, शालेय शिक्षण पुणे यांच्याकडे करण्यात आली होती.
- त्यानुसार प्राथमिक संचालक शरद गोसावी व माध्यमिक संचालक महेश पालकर यांनी राज्यातील शाळांना थेट पत्राद्वारे आदेश दिला आहे.

- यामुळे पालकांची आर्थिक लूट थांबणार असून कोणत्या ही शाळेला स्वतःचा अभ्यासक्रम तयार करण्याची मुभा देण्यात येणार नाही.
- सीबीएससी शाळांसाठी एनसीईआरटी ची क्रमिक पुस्तके व स्टेट बोर्ड शाळांसाठी एससीईआरटी ची क्रमिक पुस्तके वापरणे सर्व खाजगी शाळांसाठी बंधनकारक केले आहे.
- ही पुस्तके कोणत्याही दुकानातून खरेदी करता येतील. शा लेय गणवेश कोणत्याही दुकानातून खरेदी करता येईल.
- शाळांचा पैसा कमावण्याचा धंदा बंद.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






