पाचपिंपळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात; शेकडो लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ.

  • प्रतिनिधी : परडा : फारूक शेख :- “प्रशासन जनतेच्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत पाचपिंपळा ता परं डा जिल्हा धाराशिव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर’ अभियान अत्यंत उत्साहात संप न्न झाले.
  • या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्या णकारी योजनांचा लाभ थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचव ण्यात आला असून, तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
  • या समाधान शिबिरामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजना, अपंग अर्थसाहाय्य आणि विधवा अर्थसाहाय्य यो जनेअंतर्गत मंजूर झालेल्या शेकडो लाभार्थ्यांना त्यांचे हक्क प्रदान करण्यात आले.
  • यावेळी तहसीलदार काकडे यांनी स्वतः लाभार्थ्यांशी संवा द साधत त्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले.
  • तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन जास्ती त जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
  • शेतकऱ्यांचे प्रश्न जागेवरच मार्गी केवळ कागदपत्रांचे वाट पच नव्हे, तर स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रलंबित तक्रारींवरही या शिबिरात सकारात्मक चर्चा करण्यात आली.
  • महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अ डीअडचणी प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. अनेक क्लिष्ट विषय आणि तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
  • शासकीय अधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती या शिबिरा च्या यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार बारकर, नायब तह सीलदार पराळे, महसूल अधिकारी जाधव, महसूल अधि कारी वाघमारे, तसेच तहसील कर्मचारी वायमारे व नारा यण सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
  • याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक दिनकर खैरे, धनू खैरे, अब्दुल पटेल, बखतावर शेख, अश्विनी नायकोडे, जयतूनबी शेख यांच्यासह परिसरातील शेतकरी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • महसूल प्रशासनाच्या या तत्परतेमुळे आणि पारदर्शक का मामुळे पाचपिंपळा परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून प्रशासनाचे आभार मानले जात आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles