
ट्रॉमा केअर रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर,मनपा प्रशासन मात्र गाढ झोपेत.
- प्रतिनीधी : उदय वाघवणकर :- जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयातील बहुउद्देशीय कंत्राटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही.
- त्याचप्रमाणे २०२१ ते २०२४ या कालावधीतील त्यांचे भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कामगार विमा योजनेचे पैसेही भरण्यात आले नाहीत.

- त्यामुळे संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळ पासूनच कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामु ळे रुग्णालयातील आरोग्यसेवा कोलमडली आहे.
- ट्रॉमा केअर रुग्णालयात केअर वन कंपनी आणि के.एच. एफ.एम कंपनीला रुग्णालयातील साफसफाईसाठी बहु उद्देशीय कामगार पुरविण्याचे कंत्राट आहे.
- मात्र या दोन्ही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना किमान वेतना नुसार वेतन देण्यात आले नाही.
- तसेच केअर वन कंपनी अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मागील २७ दिवसांचे तर केएचएफएम कंपनीने मागील १५ महिन्यांचे भविष्य निर्वाह निधी व राज्य कामगार विम्याचे पैसे भरलेले नाहीत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






