
अंधेरीतील कामगार रुग्णालयाच्या पुनर्निर्माणाच्या कामातील दिरंगाई व घोटाळ्याची चौकशी आणि कारवाई करून अंधेरीतील ‘कामगार रुग्णालय’ पूर्ण क्षमतेने सुरू करा.
- प्रतिनीधी : उदय वाघवणकर :- अंधेरी (पूर्व) येथील ई. एस.आय.सी (ESIC) कामगार रुग्णालय गेल्या अनेक व र्षांपासून विविध समस्यांच्या गर्तेत अडकले आहे.
- या रुग्णालयाचे गेल्या अनेक वर्षापासून कोट्यावधी रुपये खर्च करूनही अद्याप अपूर्ण अवस्थेत असलेल्या नूतनीक रणाचे काम तातडीने पूर्ण करून ते पूर्ण क्षमतेने सुरू करा वे, अशी आग्रही मागणी मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षे त्राची खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडवियांची भेट घेऊन पत्राद्वारे केली आहे.

- केंद्रीय मंत्री यांनी देखील याची गंभीर दाखल घेऊन या संपूर्ण कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे तसेच रुग्णालयाचे अपूर्ण असलेले काम लवकर च पूर्ण करून ते पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे आश्वासन दिले.
- खासदार वायकर यांनी ९ एप्रिल २०२६ रोजी या रुग्णाल याला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.
- यावेळी १९८५ मध्ये राज्य सरकारने सुरू केलेले हे रुग्णा लय २००८ मध्ये केंद्राच्या अखत्यारीत आले. मात्र, गेल्या १५ वर्षांपासून याचे नूतनीकरण प्रलंबित आहे.
- ८ वेळा निविदा प्रक्रिया बदलूनही काम पूर्ण झालेले नाही. विलंबामुळे या प्रकल्पाचा खर्च आता मूळ २५४ कोटी रुप यांवर टेंडर पेक्षा जास्त वाढत गेल्याची माहिती, रुग्णालय प्रशासन यांनी खासदार यांना दिली.
- नियमानुसार केवळ २ मजल्यांची परवानगी असताना ति थे ८ मजल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे.
- या तांत्रिक त्रुटीमुळे रुग्णालयाला अद्याप ताबा प्रमाणपत्र’ (OC) मिळालेले नाही, असे हि चर्चे दरम्यान खासदारांच्या निदर्शनास आले.
- १८ डिसेंबर २०१८ रोजी या रुग्णालयात लागलेल्या आगी त ८ जणांचा मृत्यू झाला होता.
- इतकी मोठी दुर्घटना होऊनही प्रशासनाने सुरक्षेच्या बाब तीत आणि नूतनीकरणात कमालीची उदासीनता दाखव ली असल्याने हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी लवकरच केंद्रीय कामगार मंत्री यांची भेट घेण्याचे आश्वा सन कर्मचाऱ्यांना दिले होते.
- त्यानुसार खासदार वायकर यांनी शुक्रवारी केंद्रीय कामगा र मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांची दिल्ली येथे लोकसभेत भेट घेत याप्रश्नी निवेदन दिले.
- खासदारांनी केलेल्या प्रमुख मागण्या:
- १. रुग्णालयातील ‘अंत:रुग्ण सेवा’ (IPD) युद्धपातळीवर सुरू करावी.
- २. ९०% काम पूर्ण झालेला ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स तातडीने कार्यान्वित करावा.
- ३. मुख्य इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर प्रशासकीय कार्यालयांऐवजी स्त्री-पुरुष रुग्ण कक्ष (War ds) सुरू करावेत.
- ४.किमान एक आपत्कालीन ऑपरेशन थिएटर आणि ५ आयसीयू बेड्स त्वरित सुरू करावेत.
- ५. जुन्या कर्मचारी वसाहतीची दुरुस्ती करून नवीन कर्म चाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था करावी.
- अशा मागण्याचा हि या निवेदनात समावेश करण्यात आ ला आहे. “करोडो रुपये खर्च होऊनही केवळ नियोजना च्या अभावामुळे कामगारांना उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे.

- याप्रकरणी तातडीने बैठक बोलावून दोषींवर कारवाई क रावी आणि रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे,” अशी माग णी खासदार रवींद्र वायकर यांनी केली.
- त्यानुसार हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने लवकरच सुरु करण्या चे तसेच नुतनीकरणाच्या कामात झालेल्या दिरंगाई तसेच घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन हि केंदीय मंत्री खासदार यांना दिले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






