
जि.प. शाळा कांटे ता.लांजा या शाळेच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमा निमित्त माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेहमेळावा.
- प्रतिनीधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील जि.प. प्रा.शाळा कांटे या शाळेचा अमृत महोत्सव कार्यक्रम रवि वार दि.१९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयो जित करण्यात आला आहे.
- या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा स्नेहमेळावा, गप्पागोष्टी, हळदीकुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

- सदर सोहळ्याला मा.आ. किरणजी उर्फ भैय्या सामंत, मा. श्रीम.मानसी आंबेकर – सभापती पं.स. लांजा, मा.श्री आ देश आंबोळकर – उपसभापती पं स. लांजा आदी मान्यवर प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
- तसेच जि.प. सदस्य,पं स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, वि स्तार अधिकारी, लांजा तहसीलदार, गटविकास अधिका री, ग्रामसेवक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
- या कार्यक्रमाला सर्व शिक्षक माजी विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कांटे ग्राम स्थ, सर्व पालक व विद्यार्थी जि.प.शाळा कांटे व माजी वि द्यार्थी संघ कांटे यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






