परंडा पंचायत समितीचा कारभार रामभरोसे; गटविकास अधिकाऱ्यांच्या ‘मुहूर्ता’ची प्रतीक्षा….! गट विकास अधिकारी विनोद जाधव यांची तिन महिन्यात बदली.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- तक्रारींचा पाऊस तरीही का रवाईचा पत्ता नाही; दोन-दोन वर्षे नागरिक न्यायाच्या प्रती क्षेत.परंडा पंचायत समितीमध्ये सध्या आनंदी आनंद असू न प्रशासकीय कारभाराचा पुरता बोजवारा उडाला आहे.
  • गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांनी केलेल्या तक्रारी धूळ खात पडल्या असून, गटविकास अधिकारी (BDO) यांना या तक्रारी निकाली काढण्यासाठी मुहूर्त कधी लागणार? असा संतप्त सवाल तालुकावासीयांकडून विचारला जात आहे.
  • विशेष म्हणजे, तक्रारींचा पाऊस पडत असतानाही विस्ता र अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.
  • तक्रारींचा डोंगर, पण निकाल शून्य
  • तालुक्यातील कुंभेफळ, डोमगाव, आसू आणि भोत्रा यांसा रख्या गावांमधून अनेक गंभीर तक्रारी पंचायत समितीकडे प्राप्त झाल्या आहेत.
  • मात्र, या तक्रारींवर सुनावणी घेण्याऐवजी केवळ ‘तारीख पे तारीख’ देण्याचा प्रकार सुरू आहे. दोन-दोन वर्षे उलटू नही सामान्य नागरिकांना न्याय मिळत नसल्याने प्रशास नाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
  • या प्रकरणांत विस्तार अधिकारी देखील अपयशी ठरत अ सल्याने जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
  • नेतेमंडळी गप्प का?
  • एकीकडे सामान्य जनता कार्यालयाचे उंबरठे झिजवत अ सताना, तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि नेतेमंडळींना या परिस्थितीची कल्पना आहे की नाही? असा सवाल आ ता नागरिक विचारू लागले आहेत.
  • प्रशासनावर कोणाचाही वचक राहिला नसल्याने अधिका री आपल्याच मस्तीत वागत असल्याचा आरोप होत आहे.
  • जाधवांच्या बदलीच्या मागणीने धरला जोर
  • प्रलंबित तक्रारी निकाली काढण्यात अपयश आल्याने गट विकास अधिकारी विनोद जाधव यांच्या विरोधात जनभा वना तीव्र होत आहेत.
  • जोपर्यंत तालुक्यातील सर्व जुन्या तक्रारींचा निकाल लाग त नाही आणि दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत विनोद जाधव यांची बदली रद्द करावी आणि त्यांनी या सर्व कामां चा निपटारा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
  • प्रशासकीय ‘मुहूर्त’ कधी लागणार?
  • संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता पंचायत समितीच्या कारभा राकडे लागले आहे.
  • विस्कळीत झालेला हा कारभार सुधारण्यासाठी वरिष्ठ अ धिकारी लक्ष देणार की नागरिकांना पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागणार? हे येणारा काळच ठरवेल.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles