
सिटी इंटरनॅशनल स्कूल अचानक बंद करण्याचा शाळा प्रशासनाचा निर्णय,फौजदारी व प्रशासकीय कारवाई करा-खासदार रविंद्र वायकर यांची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी.
- प्रतिनीधी : उदय वाघवणकर :- ओशिवरा येथील नामां कित सिटी इंटरनॅशनल स्कूल प्रशासनाने शाळा अचानक बंद करण्याचा शाळा प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतल्या मुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आल्याने, शाळा प्रशासनावर फौजदारी तसेच प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
- अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदा र रविंद्र वायकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यां च्याकडे पत्राद्वारे केली आहे.
- ओशिवरा आणि गोरेगाव परिसरातील अनेक विद्यार्थी या शाळेत अनेक वर्षांपासून शिक्षण घेत आहेत.

- प्रवेशाच्या वेळी शाळा प्रशासनाने पालकांकडून ४०,००० रुपये ‘देणगी’ स्वरूपात स्वीकारले होते आणि इयत्ता १० वी पर्यंत विनाअडथळा शिक्षण देण्याचे आश्वासन दिले होते.
- मात्र, आता शाळा प्रशासनाने अचानक शाळा बंद करण्या चा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शैक्षणि क नुकसान होत असल्याचा आरोप पालकांकडून करण्या त येत आहे.
- शाळा सोडल्याचा दाखला देण्याऐवजी शाळा प्रशासन पालकांना ईमेलवर ‘ट्रान्सफर सर्टिफिकेट’ पाठवत आहे. शाळा बंद झाल्याची अधिकृत नोंद टाळण्यासाठी प्रशास न असे करत असल्याचा पालकांचा आरोप आहे.
- पालकांकडून घेतलेली मोठी रक्कम आणि फी यांबाबत शाळा प्रशासनाने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.
- शाळा अचानक बंद करण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतल्यामुळे आता या विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये प्रवेश कसा मिळणार, असा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे.
- या प्रश्नी पालकांनी खासदार रवींद्र वायकर यांची भेट घेतली होती.
- खासदार वायकर यांनी याची गंभीर दखल घेत शालेय शि क्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र पाठवून शाळा प्रशासनावर तातडीने फौजदारी आणि प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
- पालकांकडून घेतलेली देणगीची रक्कम व्याजासह परत करण्यात यावी, ‘शिक्षण हक्क कायद्या’नुसार बाधित वि द्यार्थ्यांचे तातडीने शैक्षणिक पुनर्वसन करावे, विद्यार्थ्यांना रीतसर ‘शाळा सोडल्याचा दाखला’ मिळवून द्यावा.
- शाळेच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान हो ऊ दिले जाणार नाही. सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.” अशी मागणी केली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






