
जोगेश्वरीत रुग्णसेवेचा नवा अध्याय,मोफत होमिओपॅथी दवाखाना सुरू.
- प्रतिनीधी : उदय वाघवणकर :- जय गणेश चॅरिटेबल ट्र स्ट आणि दत्ताराम गोविंद वायकर स्मृती ट्रस्ट यांच्या संयु क्त विद्यमाने जोगेश्वरी पूर्व येथे ‘मोफत होमिओपॅथी दवा खान्याचे’ मनिषा रविंद्र वायकर यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन करण्यात आले.

- गरजू रुग्णांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देणे,हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

- या दवाखान्यात खालील सेवा मोफत दिल्या जातील:
- मोफत तपासणी आणि औषधे: रुग्णांची संपूर्ण तपास णी करून त्यांना होमिओपॅथी औषधे मोफत पुरवली जातील.
- मोतीबिंदू शस्त्रक्रिया: गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू ऑपरेशन्सची विशेष व्यवस्था करण्यात येईल.

- दिव्यांगांसाठी साहाय्य: श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती यांच्या सहकार्याने व्हीलचेअर, श्रवणयंत्र, वॉकर, जयपूर फूट आणि इतर कृत्रिम अवयव मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.
- कार्यक्रमाला अॅड. दिप्तीताई वायकर पोतनीस,रचना सावं त,विशाल धुरी,बाबू धामापूरकर,अनिरुद्ध नारकर, सुमित पवार,महिला व पुरुष पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






