
महात्मा गांधी विद्यालयाचा ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती धारक यांचा महाराष्ट्र दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा: येथील महा त्मा गांधी विद्यालयाने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यां साठी घेण्यात आलेल्या एन.एम.एम. एस. (NMMS) स्प र्धा परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
- या यशाबद्दल आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वि द्यालयात शिष्यवृत्तीधारक व गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
- १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक बा ळासाहेब काशीद आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नूतन नगरसेवक मदन सुभाषसिंह सिद्धिवाल यांच्या हस्ते महा त्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.

- यावेळी विविध तुकड्यांमधील गुणानुक्रमे आलेले विद्यार्थी आणि मागासवर्गीयातून प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना गुणपत्रके वाटप करण्यात आली.
- शिष्यवृत्ती परीक्षेत २६ विद्यार्थी उत्तीर्णNMMS परीक्षेत विद्यालयातील एकूण २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ५ विद्यार्थ्यांनी १०० पेक्षा जास्त गुण मिळवून गुणवत्ता या दीत स्थान मिळवले आहे.
- २४ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार, प्रशालेचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
- यामध्ये साक्षी अविनाश चोबे (११९ गुण), समीक्षा समाधा न सुरवसे (११९ गुण) आणि अलीम मोहम्मद मुलानी (११७ गुण) यांचा समावेश आहे.
- या सर्व विद्यार्थ्यांनी ‘ओपन’ प्रवर्गातून हे यश मिळवले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना श्री.मिसाळ सर, बाळाभाई मॅडम, श्री.पेजगुडे सर, श्री.मुडपे सर, श्री.शिंदे सर आणि श्री.शेळके सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
- विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव आर. डी.सूळ (आण्णा) सर, मुख्याध्यापक बाळासाहेब काशीद व सर्व स्टाफने विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभि नंदन केले आहे.
- या कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक दिलीप शेरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






