
पुणे येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेचे तीव्र पडसाद; परंडा तहसीलदारांना निवेदन देऊन फाशीची मागणी.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- पुणे जिल्ह्यातील न सरापूर (ता. भोर) येथे ४ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेचे तीव्र पडसाद परंडा तालुक्यात उमटले आहेत.
- या अमानुष आणि हृदयद्रावक घटनेचा निषेध करण्यासा ठी परंडा शहरातील ब्राह्मण समाजातील महिला तसेच वि विध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येत परंडा तहसीलदारांना निवेदन दिले.

- या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, परंडा तालु क्यातील ग्रामस्थांनी आरोपीच्या या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालव ण्याची मागणी.
- तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात परंड्यातील नागरिकांनी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
- तात्काळ फाशी: या नराधम आरोपीविरुद्धचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
- कुटुंबाला मदत: पीडित कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी.
- संरक्षण: पीडित कुटुंबाला आवश्यक ते संरक्षण पुरवण्यात यावे.
- मान्यवरांनी व्यक्त केल्या संतप्त भावनायावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
- ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष समीर कुलकर्णी आणि भाजप चे विकास कुलकर्णी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.
- तसेच, महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर प्रशासनाने कडक पा वले उचलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

- या प्रसंगी सौ.राखीताई देशमुख, सौ.ज्योतीताई भातलवं डे, सौ.घोगले, सौ.जोशी यांच्यासह परंडा शहरातील विवि ध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






