वाटूळ येथील दानशूर व्यक्तीमत्व श्री संतोष (बंधू) चव्हाण यांनी तिवंदामाळ येथील जमीन राजापूर लांजा तालुका नागरिक संघाला दिली विनामूल्य भेट.

  • प्रतिनीधी : वाटूळ : प्रमोद तरळ :- राजापूर लांजा तालु का नागरिक संघ मुंबई या संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष लाड यांच्या पासष्टीनिमित्त लांजा येथे आयोजित केलेल्या गौर व ग्रंथ प्रकाशन समारंभात त्यांना रुपये पासष्ट हजारांची थैलीही प्रदान करण्यात आली.
  • त्यावेळी गौरव मूर्ती सुभाष लाड यांनी त्या रकमेत स्वतःचे पस्तीस हजार रुपये जोडून रुपये एक लाख रुपयांची र क्कम संघाकडे सुपूर्त करीत असल्याचे जाहिर केले.
  • ती रक्कम संघाच्या कार्यालयीन इमारती करीता वापरण्या त यावी अशी अपेक्षा व्यक्त केली व सदरच्या इमारती करी ता राजापुरात जागा शोधण्याकरीता कामास लागावे असे आवाहन त्यांनी केले.
  • त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले वाटुळ गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष श्रीधर चव्हाण यांनी व्यास पीठावरती येऊन आपण राजापूर लांजा तालुका नागरिक संघाकरिता वाटुळ गावातील तिवंदे माळ येथील मुंबई गो वा हम रस्त्याला लागून महापुरुष मंदिरा शेजारील आप ल्या मालकीची पाच गुंठे जमीन आपले वडील सुप्रसिद्ध भजन गायक स्व.शिरी बुवा तथा श्रीधर चव्हाण यांच्या स्मरणार्थ विनामूल्य देत असल्याचे जाहीर केले.
  • चांगल्या कामाला लवकरच सुरुवात करावी या भावनेने श्री.संतोष चव्हाण यांच्या सुचनेनुसार दि. ४ मे २०२६ रोजी सकाळी नऊ वाजता वाटुळ गावचे ग्रामस्थ व राजा पूर लांजा तालुका नागरिक संघाचे कार्यकर्ते एकत्र येऊन वाटुळ गावचे ग्रामदैवत श्री.महादेवाचे  दर्शन घेऊन  व सर्व मिळून तिवंदे माळ येथे संघास मिळालेल्या जागेची पाहणी केली.
  • त्या जागेवरती जमीन मालक श्री.संतोष चव्हाण यांनी  फु ले वाहून जमीन राखणदारास ‘ ही जागा राजापूर लांजा तालुका नागरिक संघाकडे सुपूर्द करीत असून या जागेत त्यांना सुख समाधान लाभावे ‘ असे गाऱ्हाणे घातले व श्रद्धेचे श्रीफळ वाढवले.
  • या शुभ समयी संघाकडून श्री संतोष चव्हाण यांना सुप्रसि द्ध चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन संघातर्फे सन्मानित करण्यात आले.
  • संघाचे अध्यक्ष श्री.सुभाष लाड यांनी  जमीन देणगीदार श्री संतोष श्रीधर चव्हाण यांच्या दातृत्वाचे कौतुक करुन लवकरच संघाचे राजापुरात कार्यालय तसेच समाजोपयो गी इमारत उभी राहिल याबद्दल समाधान व्यक्त केले.
  • अशीच व्यवस्था व कार्यालय लांजा मध्येही उभे राहिल, त्यासाठी दानशूर श्री नंदकुमार पाटोळे यांनी देऊ केलेली जागा लवकरच संघाकडे येईल अशी आशा व्यक्त केली.
  • या छोटेखानी सुंदर कार्यक्रमात  ह.भ.प. बाळकृष्ण बुवा चव्हाण, श्री.विश्वास वि.चव्हाण,श्री सुहास स.चव्हाण, श्री. संतोष म.भुर्के,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.चंद्रकांत खा मकर,श्री.महेंद्र साळवीसर,श्री.काशिनाथ चव्हाण, श्री.जय राज मांडवकरसर, श्री.प्रकाश वळंजू , श्री.संजय वि.चव्हा ण, सौ.स्मिता बोधनकर.सौ वीणा वि. चव्हाण,सौ.नंदा बा. चव्हाण,सौ.वर्षा कृ.चव्हाण हे उपस्थित होते तर या कार्य क्रमाचे नियोजन संघाचे पदाधिकारी श्री.विराज चव्हाण यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles