
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षांचा करमाळ्यात सत्कार; कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन.
- प्रतिनीधी : परंडा : फारूख शेख :-माहिती अधिकार म हासंघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष फारूक शेख हे शासकीय कामाच्या निमित्ताने करमाळा येथे आले असता, करमाळा तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
- यावेळी शेख यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माहिती अधिकार कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

- करमाळा तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेचे अध्यक्ष विशाल परदेशी यांच्या पुढाकाराने आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात फारूक शेख यांनी माहिती अधि कार कायद्याचा प्रभावी वापर कसा करावा आणि सर्वसा मान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या कायद्याची कशी मदत घ्यावी, यावर प्रकाश टाकला.
- मार्गदर्शनानंतर तालुका शाखेच्या वतीने शेख यांचा फेटा बांधून आणि शाल, श्रीफळ, पुष्पहार देत यथोचित सत्कार करण्यात आला.
- याप्रसंगी माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेचे तालुका सं घटक विशाल राठोड, मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष आ यूब शेख, पत्रकार आलिम शेख, सोहेल शेख, तात्या ओहा ळ, ईजाज पटेल यांच्यासह महासंघाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






