
श्री संदीप बाळकृष्ण परटवलकर गुरुजी यांची जवळेथर केंद्र शाळेत केंद्र प्रमुख म्हणून बढतीने नियुक्ती.
- प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील लहा न थोरांचे सर्वांचे परिचयाचे असलेले जवळेथर केंद्र शाळे त पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले गेले दोन वर्षे प्रभारी पदाचा कार्यभार सांभाळून वर्ग अध्यापन, मुख्या ध्यापक म्हणून तिहेरी भुमिका अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडणारे परटवलकर गुरुजी…
- सामाजिक, सांस्कृति क शैक्षणिक कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभाग घेणारे परटवलकर गुरुजी कबड्डी क्रिकेट व्हॉली बॉल सामन्यांचे उत्कृ ष्ट समालोचन करणारे परटवलकर गुरुजी..
- कोणत्याही कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लिलया पार पाडून कार्यक्रमाची रंगत वाढवणारे परटवलकर गुरुजी..

- आपल्या आईवडिलांची सेवा करता यावी म्हणून गड्या आपला गावच बरा मानून एकतीस वर्षे सेवा मुंढर नं १, डोंगर नं ३, मूर नं ५ सुतार वाडी, कोळंब, जवळेथर, करक नं ३ गावमंडणवाडी आणि पुन्हा आदर्श केंद्र शाळा जवळे थर तालुका राजापूर येथे सेवा करुन ग्रामीण भागात गुण वान चारित्र्यवान विद्यार्थी घडवणारे परटवलकर गुरुजी.. शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून शंभर टक्के निकाल लावण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणारे परटवलकर गुरुजी..
- आजही परटवलकर गुरुजींचे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर वकिल, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच या पदावर काम करत आहेत.
- परटवलकर गुरुजी यानी रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आद र्श शिक्षक पुरस्कार प्राप्त करून राष्ट्रीय एकात्मता फेलो शिप, कोकणरत्न, ज्वेल आँफ इंडिया, शिक्षक भूषण, महा त्मा ज्योतिबा फुले शिक्षक पुरस्कार, बेस्ट टिचर्स अँवार्ड, असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.
- पण या सर्वांमध्ये आईबाबांचे आशिर्वाद. चुलते कै रामजी परटवलकर यांची प्रेरणादायी साथ.. कैलासवासी आदर्श शिक्षक गुरुवर्य श्री महादेव कुंडेकर गुरुजी यांचे आशीर्वा द.. कै.राहुल गायकवाड गुरुजी यांचे मार्गदर्शन.. याच बरो बर मित्र परिवार कुटुंबाची व पत्नी संजना संदीप परटवल कर हीची अनमोल साथ या बळावरच हे यश मिळाले आहे.
- सीटिईटी व टिईटी सारखी कठीण परीक्षा लिलया पार क रुन पात्र ठरलेले परटवलकर गुरुजी… जवळेथर गावचे सरपंच अंजली मोरे मॅडम, व सर्व सदस्य शाळा व्यवस्था पन समिती अध्यक्ष श्री रमाकांत मोरे व सर्व सदस्य. जि ल्हा परिषद सदस्या सौ सिद्धाली मोरे मॅडम माजी विद्या र्थी संघाचे अध्यक्ष श्री सुरेश मोरे साहेब. युवा सेना विभाग प्रमुख युवराज मोरे यांनी अभिनंदन केले आहे.
- जामदाखोऱ्यातील तसेच राजापूर तालुक्यातील सर्व मान्य वरानी परटवलकर गुरुजींचे अभिनंदन केले आहे..
- परटवलकर गुरुजी युवा मंच मिळंद, राजापूर तालुका चर्म कार समाज सेवा संघाचे सहचिटणीस,महाराष्ट्र राज्य प्राथ मिक शिक्षक संघाचे राजापूर तालुका अध्यक्ष, आदर्श शिक्षक गुरुवर्य कै श्री महादेव कुंडेकर फाऊंडेशन पाचल चे खजिनदार म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडत आहेत.
- आज जवळेथर केंद्राच्या केंद्र समन्वयक म्हणजे केंद्र प्रमु ख पदावर बढती ने नियुक्ती झाली त्या बद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






