
दिव्यांग अत्याचार प्रकरणातील आरोपींना बेड्या; आंबी पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-परंडा तालुक्यातील चिंचपूर बु. येथे एका दिव्यांग व्यक्तीवर झालेल्या अत्याचा र प्रकरणी आंबी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे.
- या घटनेतील आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करून त्यांची रवानगी धाराशिव जिल्हा कारागृहात केली आहे.
- पोलिसांच्या या त्वरित भूमिकेमुळे दिव्यांग बांधवांनी समा धान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.
- नेमके प्रकरण काय?चिंचपूर बु. येथील एका दिव्यांग व्य क्तीला अत्याचार आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागले होते.

- याप्रकरणी दिव्यांग हक्क अधिनियम (कलम ९२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- घटनेचे गांभीर्य ओळखून आंबी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड यांनी तपासाची चक्रे वेगाने फि रवली आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
- अटकेनंतर आरोपींची रवानगी जिल्हा कारागृहात करण्या त आली आहे.
- पोलीस प्रशासनाचे आभारदिव्यांगांवरील अन्यायाविरोधा त पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल दिव्यांग बांध वांच्या वतीने पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.
- “समाजातील दुर्बल घटकांवर अन्याय करणाऱ्यांना कायद्याचा धाक असणे आवश्यक आहे, पोलिसांच्या या कारवाईमुळे आम्हाला न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे,” असे मत दिव्यांग बांधवांनी व्यक्त केले.
- कठोर शिक्षेची मागणीपोलिसांनी घेतलेली भूमिका कौतु कास्पद असली तरी, संबंधित आरोपींना न्यायालयातून क ठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही दिव्यांग बांधवांनी केली आहे.
- या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यतत्परतेची च र्चा असून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






