बावची विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते गौरव; कु.गायत्री कोरे ९९.६० टक्क्यांसह तालुक्यात प्रथम; सचिन मोरे यांचा विशेष सन्मान.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- परंडा येथील बावची विद्या लय व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालयात मार्च २०२६ मध्ये झालेल्या १० वी (SSC) आणि १२ वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा ८ मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
  • या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून परंड्याचे तहसीलदार मा. निलेश काकडे उपस्थित होते.
  • यंदा विद्यालयाचा निकाल उत्कृष्ट लागला असून, १० वी च्या २२९ विद्यार्थ्यांपैकी २२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
  • यात १२१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य (Distinction) मि ळवले, तर ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या ४२ विद्यार्थ्यांचा तहसीलदार काकडे यांच्या हस्ते विशेष सत्का र करण्यात आला.
  • यामध्ये कु. गायत्री गणेश कोरे हिने ९९.६० टक्के गुण मि ळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तिचे विशेष कौतुक करण्यात आले.
  • या सोहळ्यात कला व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यां चाही गौरव करण्यात आला. गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शि क्षक सचिन मोरे यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
  • कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बिभिषण रोडगे होते.
  • तहसीलदार निलेश काकडे यांनी आपल्या भाषणात विद्या र्थ्यांच्या कष्टाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
  • प्राचार्य नारायण खैरे यांनी प्रास्ताविक व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास वाघमारे यांनी केले. याप्रसंगी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles