
मुंबई गोवा महामार्गावर टोल वसुली सुरु…! जनआक्रोश समितीतर्फे सोमवार २५ मे रोजी खारपाडा टोलच्या विरोधात “ठिय्या आंदोलन”
- प्रतिनीधी : पनवेल : प्रमोद तरळ :- मुंबई-गोवा महामा र्ग हा कोकणातील लाखो नागरिकांचा जीवनमार्ग आहे.
- मागील १७ वर्षांपासून वर्षांपासून या महामार्गाच्या चौपद रीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून आजही अ नेक ठिकाणी रस्ता अपूर्ण, धोकादायक आणि अपघातप्र वण स्थितीत आहे.
- अनेक पूल,सर्व्हिस रोड,जंक्शन,अंडरपास, ड्रेनेज व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या मूलभूत सुविधा अद्याप पूर्ण झाले ल्या नाहीत.

- अशा परिस्थितीत महामार्गावरील खारपाडा येथे टोलवसु ली सुरू करण्यात आलेली आहे. अपूर्ण आणि असुरक्षित रस्त्यावर जनतेकडून टोल वसूल करणे हा अन्यायकारक निर्णय असून नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यासारखा प्रकार आहे.
- महामार्गावर सध्या अनेक ठिकाणी धोकादायक डायव्हर्श न,अपूर्ण उड्डाणपूल, चुकीचे व अचानक येणारे गतिरोधक, खड्डे,अंधारे रस्ते, योग्य दिशादर्शक फलकांचा अभाव स र्व्हिस रोड नसणे वाहतूक कोंडी, अपघातांची वाढती संख्या अशा गंभीर समस्या कायम आहेत.
- यामुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.
- आधी समितीच्या वतीने सुचवलेल्या खालील मागण्या ता त्काळ मान्य कराव्यात मगच टोलवसुली करावी
- जन आक्रोश समितीच्या मागण्या-
- 1) महामार्गावरील सर्व अपूर्ण कामे पूर्ण होईपर्यंत टोलवसुली तात्काळ बंद करावी.
- 2) संपूर्ण महामार्गाची स्वतंत्र Safety Audit करून अहवाल सार्वजनिक करावा.
- 3) सर्व अपूर्ण पूल, उड्डाणपूल, जंक्शन, सर्व्हिस रोड आणि अंडरपास यांची निश्चित पूर्णता मुदत जाहीर करावी.
- 4) कोकणातील नियमित धावणाऱ्या वाहनांना टोलमाफी अथवा सवलतीचा मासिक पास लागू करावा, तसेच टोल दर कमी करावा.
- 5) अपघातप्रवण ठिकाणांवर तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात.
- 6) महामार्गावरील अपघातग्रस्तांना त्वरित मदत, रुग्णवाहिका व नुकसानभरपाई व्यवस्था सुरू करावी.
- 7) महामार्गावरील सर्व धोकादायक डायव्हर्शन व चुकीचे गतिरोधक तात्काळ हटवावेत.
- 8) कोकणातील जनप्रतिनिधी, स्थानिक नागरिक आणि संघटनांसोबत संयुक्त बैठक आयोजित करावी.
- कोकणातील लोकप्रतिनिधी अद्याप या प्रश्नावर गप्प अस ले तरी याच महामार्गाच्या पूर्णत्वासाठी स्थापन झालेल्या जन आक्रोश समितीने जनतेवर लादण्यात येणाऱ्या अन्या यकारक टोलवसुलीला ठाम विरोध करत सोमवार दि २५ मे २०२६ रोजी खारपाडा टोलच्या विरोधात “ठिय्या आंदो लन” चा इशारा दिला आहे.
- पहिले सुरक्षित आणि पूर्ण महामार्ग द्या, मगच टोल घ्या!” या मागणीसाठी समस्त कोकणवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मुंबई गोवा महामार्ग जनआ क्रोश समितीने केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






