
परंडा न्यायालयात प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीम.अभिश्री देव यांच्या हस्ते असुरक्षित साक्षीदार केंद्राचे उद्घाटन.
- प्रतिनीधी : फारुख शेख :-दि २४ मे परंडा येथील अति. जिल्हा व सत्र न्यायालय येथे असुरक्षित साक्षीदार केंद्राचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीम.अभिश्री देव यांच्या शुभहस्ते व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ.एफ ए एम ख्वाजा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
- या असुरक्षित साक्षीदार केंद्रामुळे साक्षीदारांना भयमुक्त व विना दबाव साक्ष नोंदविता येणार आहे.

- या उद्घाटन सोह ळ्यास परंडा न्यायालयाचे दिवाणी न्याया धीश वरिष्ठ स्तर ए.ए.शेख,दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर डी.जी.जगताप, जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रवीण गाडे, परंडा विधीज्ञ संघाचे कार्याध्यक्ष ॲड. सुहास पाटील,परंडा तहसीलच्या अप्पर तहसीलदार श्रीमती पूनम पाटील,बांध काम विभागाच्या उपअभियंता श्रीम.वडगावे मॅडम,कनिष्ठ अभियंता सावंत,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसाट आदिंची उपस्थिती होती.
- सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परंडा विधीज्ञ संघाचे उपाध्यक्ष ॲड.हनुमंत घोगरे व महिला सदस्य बालिका ब नसोडे,सचिव ॲड.अजित महाडिक,जेष्ठ विधीज्ञ ॲड.दादा साहेब खरसडे,ॲड.आय डी शेख, ॲड.एस आर काळे, ॲ ड.नुरोद्दीन चौधरी ॲड.हनुमंत वाघमोडे,ॲड.संदीप पाटील , ॲड.दत्तात्रय सूर्यवंशी,नागनाथ सूर्यवंशी, ॲड.संतोष सूर्य वंशी,ॲड.विवेक काळे, ॲड.बापू जामदारे,ॲड.अमोल पा टील, आप्पासाहेब जगताप, ॲड.अमोल करळे, ॲड.सुनि ल शिंदे,श्रीकृष्ण सोनमाळी ॲड. राहुल वाघमारे,आफताब शहाबर्फीवले, ॲड.महेश चोपडे,किशोर खबाले,ॲड. ताना जी गरड,न्यायालयीन अधीक्षक शहाजी दळवे, सहाय्यक अधीक्षक नेताजी पेठे,श्रीम.मीना पवार यांचे सह इतरांनी परिश्रम घेतले.

- कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधीज्ञ संघाचे कार्याध्यक्ष ॲड. सु हास पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन ॲड.संतोष सूर्यवं शी व व्ही. एम.काळे यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






