
कूभेफळ येथे बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी; हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा, पोलीस उपनिरीक्षक मुळे यांचा सत्कार.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील कूभेफळ येथे मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘बकरी ईद’ (ईद-उल-अजहा) अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक धार्मि क वातावरणात साजरा करण्यात आला.
- या निमित्ताने गावात सामाजिक सलोख्याचे आणि आनंदा चे वातावरण पाहायला मिळाले. हिंदू आणि मुस्लिम बांध वांनी एकत्र येत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
- मशिदीत ईदची नमाज आणि देशासाठी प्रार्थनागावातील मुख्य मशिदीमध्ये ईदची पवित्र नमाज अदा करण्यात आली.

- मौलाना मोहम्मद शफीक एकबाल अन्सारी यांनी अत्यंत भक्तीभावाने सर्व मुस्लिम बांधवांकडून ईदची नमाज पठ ण करून घेतली.
- नमाज संपन्न झाल्यानंतर उपस्थितांनी देशात शांतता, समृ द्धी, प्रगती आणि बंधुभाव टिकून राहण्यासाठी विशेष प्रार्थना (दुआ) केली.
- नमाजनंतर सर्व मुस्लिम बांधवांनी आणि ग्रामस्थांनी एक मेकांची गळाभेट घेऊन ईदच्या मुबारकबाद दिल्या.
- पोलीस उपनिरीक्षक मुळे साहेब यांचा सत्कारईदच्या या पवित्र पर्वावर गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ करण्यासाठी परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मुळे साहेब यांनी कूभेफळ गावाला भेट दिली.
- याप्रसंगी कूभेफळ ग्रामस्थांच्या वतीने पोलीस उपनिरीक्ष क मुळे साहेब यांचा पुष्पहार देऊन यथोचित सत्कार कर ण्यात आला.
- प्रशासनाने ठेवलेल्या चोख व्यवस्थेबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
- मान्यवरांची व ग्रामस्थांची मोठी उपस्थितीया सलोख्याच्या आणि उत्साही कार्यक्रमाला गावातील प्रमुख नागरिक, लो कप्रतिनिधी आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- यामध्ये प्रामुख्याने मौलाना मोहम्मद शफीक एकबाल अ न्सारी, उपसरपंच फारुक शेख, अब्दुल पटेल, आकबर शे ख, शिद्दीक शेख, रफीक शेख, फकीर पठाण, जावेद पठा ण, गवश पठाण, समद शेख, सादिक शेख, पोलीस पाटी ल आतिक काजी, जबार शेख, कादर बेग, पाशू शेख, जा केर शेख, पापा शेख, समीर शेख, अहमद शेख, रहीमद शे ख,आशिफ शेख,मुस्ताक शेख, नाशीर शेख, ईमदात शेख, बाबूल शेख, वाजिद पठाण, शमशोदीन सय्यद, आयान शेख, मुबीन शेख, कयूम शेख, शाहेर शेख, वहाब बेग, सो हेल बेग, सोहेल सय्यद, ईसाक शेख, आझाद शेख, बाबा श्या शेख, लिहान यांच्यासह गावातील लहान थोर मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






