
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त दिल्लीत भव्य राष्ट्रीय जनजाती सांस्कृतिक महासंगम संपन्न; आदिवासी परंपरा संरक्षणासाठी कायद्याची मागणी.
- प्रतिनीधी : हर्षल ठाकरे :- भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने दिल्ली येथील लाल किल्ला मैदानावर भव्य राष्ट्रीय स्तरावरील “जनजाती सांस्कृतिक महासंगम” उत्सा हात संपन्न झाला.
- देशभरातील सुमारे ५०० जनजाती समूहांचे प्रतिनिधी आ णि दीड लाखांहून अधिक जनजाती बांधव या ऐतिहासि क महासंगमात सहभागी झाले होते.
- जनजाती सुरक्षा मंच स्थापनेनंतर तब्बल २१ वर्षांनी आ योजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय मेळाव्यात विविध राज्यांतील आदिवासी समाजाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.
महाराष्ट्रातूनही रेल्वे, खासगी वाहने व इतर माध्यमांतून मो ठ्या संख्येने समाजबांधव दिल्ली येथे दाखल झाले.राज्या तील विविध जिल्ह्यांतून अंदाजे १५ ते २० हजार महिला-पुरुष सहभागी झाले होते.- देवगिरी प्रांतातील तेरा जिल्ह्यांचे नेतृत्व जनजाती सुरक्षा मंचचे संयोजक व केंद्रीय टोळी सदस्य डॉ.विशाल वळवी यांनी केले.
- या महासंगमात देशातील विविध जनजाती समाजांच्या स मृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले. पारंपरिक नृत्य, वे शभूषा, लोककला आणि सांस्कृतिक परंपरांचे सादरीकर ण करण्यात आले.
- सामाजिक समरसता, राष्ट्रीय एकात्मता आणि “तू-मैं एक रक्त” हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
- महासंगमादरम्यान आदिवासी समाजाच्या रूढी, परंपरा आणि सांस्कृतिक ओळख जतन करण्यासाठी केंद्र सरका रने विशेष कायदा करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
- तसेच धर्मांतरामुळे आदिवासी समाजाची सांस्कृतिक ओ ळख धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त करत, धर्मांत रबंदी कायदा लागू करावा आणि जे व्यक्ती आदिवासी समाजातून इतर धर्मात प्रवेश करतात त्यांना अनुसूचित जमातींसाठी असलेल्या शासकीय सवलती व आरक्षणा चा लाभ देऊ नये, अशी मागणी देशभरातील आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली.
- या प्रतिनिधी मंडळामध्ये साक्री येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ तथा जनजाती सुरक्षा मंचचे केंद्रीय टोळी सदस्य डॉ. विशाल वळवी यांचाही सक्रिय सहभाग होता.
- दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांनी आदिवासी समाजाच्या विवि ध प्रश्नांबाबत देशाच्या नेतृत्वापर्यंत भूमिका पोहोचविण्या साठी प्रयत्न केले.
- कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य सेवा, निवा स, भोजन, वाहतूक, सुरक्षा आणि स्वच्छता यांसह सर्व सुविधांची व्यापक व्यवस्था करण्यात आली होती.
- दिल्लीतील नागरिक व स्वयंसेवकांनी विविध राज्यांतून आलेल्या जनजाती बांधवांच्या स्वागतासाठी पुढाकार घेतला होता.

- जनजाती सुरक्षा मंच (देवगिरी प्रांत) चे संयोजक डॉ.विशा ल वळवी, सहसंयोजक मौल्या गावित तसेच सदस्य अशो क पाडवी, भरत गावित यांनी या महासंगमाला मिळाले ल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत आदि वासी संस्कृती, परंपरा आणि अधिकारांच्या संरक्षणासाठी समाजाने संघटित राहण्याचे आवाहन केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






