
ओबेरॉय स्कूलची मनमानी,रस्त्यावर अवैध पार्किंग;कारवाई करणार कोण…?
- प्रतिनीधी : उदय वाघवणकर :-जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड वरील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलच्या बाहेर वाहतूक नियमांची पायमल्ली झाल्याचे पाहायला मिळते.

- या उच्चभ्रू शाळेतील पालक त्यांच्या मुलांना शाळा सुट ल्यावर घेऊन जाण्यासाठी गाड्या घेऊन येतात परंतु ते त्यांच्या या पंचतारांकित गाड्या या हायवेवर वाहतुकीचे नियम न पाळता उभ्या करतात.

- त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची समस्या रोज निर्माण हो त असते. बेस्ट बस सुद्धा इथून जाऊ शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात याठिकाणी राजरोसपणे अवैध पार्किंग केली जाते.

- ओबेरॉय स्कूलची ही मनमानी लोकांच्या जीवावर उठली आहे. यामुळे अपघात घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार…?
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






