ओबीसींच्या आक्रमक जनक्षोभापुढे प्रशासन झुकले ; जातीनिहाय जनगणना दुसऱ्या टप्प्यात केली जाणार असल्याचे आश्वासन.

  • प्रतिनीधी : प्रमोद तरळ :- “जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलम नाही, तर जनगणना नाही!” आणि “ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे…!”
  • अशी आक्रमक भूमिका घेत १ जून २०२६ रोजी ओबीसी जनमोर्चाच्या वतीने संगमेश्वर (देवरुख) तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र बेमुदत ठिय्या आंदोलन व निदर्शने करण्यात आली.
  • ओबीसींच्या या प्रचंड जनक्षोभापुढे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे. दुपारी ठीक दोन वाजता तहसी लदार प्रशासनाकडून आंदोलकांना अधिकृत लेखी पत्र देण्यात आले.
  • “ओबीसींची जातीनिहाय जनगणनेची मागणी ‘जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये’ केली जाईल” असे लेखी आश्वासन प्रशासनाने पत्राद्वारे दिल्यानंतर ओबीसी जनमो र्चाने आपले आंदोलन तूर्तास स्थगित (तात्पुरते मागे) कर ण्याचा निर्णय घेतला आहे.
  • ओबीसींच्या हक्कासाठी पुकारण्यात आलेल्या या आंदोल नात ओबीसी जनमोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष शरदचंद्र गिते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, अवि नाश लाड, सहदेव बेटकर, पंचायत समिती सभापती शर्व री वेल्ये, उपसभापती प्रफुल्ल बाईत, संगमेश्वर तालुकाध्य क्ष कृष्णा हरेकर यांसह अनेक प्रमुख पदाधिकारी व समा जबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • हा तर ओबीसींच्या एकजुटीचा विजय आहे, पण लढाई अजून संपलेली नाही! प्रशासनाने लेखी आश्वासन दिले म्हणून आम्ही आजचे आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे.
  • पण लक्षात ठेवा,जर २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यात ओबीसीं चा स्वतंत्र कॉलम समाविष्ट करून जातीनिहाय जनगणना झाली नाही, तर यापेक्षा तीव्र आणि महाभयंकर उद्रेक सं पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात पहायला मिळेल ओबीसी आप ल्या हक्काचा एक इंचही मागे हटणार नाही असा इशारा ओबीसी जनमोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष शरदचंद्र गिते यांनी दिला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles