
विद्युत वायर्समुळे भीमशक्तीनगर मधील नागरिकांच्या जीवितास धोका; तात्काळ कारवाईची मागणी.
- प्रतिनिधी : पिंपरी/ चिंचवड :- दि.२०२६पिंपरी चिंचव ड शहरातील स्पाईन रोड लगत असणारी भीमशक्ती नगर परिसरातील विद्युत वायर्स खाली लोंबकळत असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
- याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते तथा सामाजि क कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी विश्वनाथ लहाने कार्यकारी अभियंता भोसरी विभाग महावितरण यांच्या कडे लेखी तक्रार दाखल करून तात्काळ दुरुस्तीची माग णी केली आहे.

- तक्रारीनुसार, स्पाईन रोड लगतं भीमशक्तीनगर परिसराती ल दाट लोकवस्तीच्या भागात विद्युत तारा अत्यंत खाली आल्या असून, नागरिकांच्या घरांजवळ तसेच रस्त्यालगत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
- या भागात सुमारे 10 हजारांहून अधिक नागरिक वास्त व्यास असून दररोज मोठ्या प्रमाणात पादचाऱ्यांची वर्दळ असते.

- विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सु रक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, मागील काही वर्षां पासून ही समस्या कायम असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
- वादळी वाऱ्यामुळे किंवा पावसाळ्यात या तारा तुटण्याची शक्यता वाढत असून त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भी ती व्यक्त केली जात आहे.

- मारुती जाधव यांनी महावितरण विभागाकडे तात्काळ पा हणी करून लोंबकळणाऱ्या विद्युत तारा उंचावणे, आव श्यक दुरुस्ती करणे आणि परिसरातील नागरिकांच्या सुर क्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची माग णी केली आहे.

- नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा गंभीर प्रश्न असल्याने महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






