
स्थानिक युवकांच्या रोजगारासाठी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीची विविध जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदने.
- प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :-राज्यातील स्थानिक युवकांना रोजगारामध्ये न्याय मिळावा आणि “राज्यातील ८०% स्थानिक उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्या च्या शासन निर्णयाची” कठोर व प्रभावी अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी विविध जिल्हाधिकारी कार्यालयां मध्ये निवेदने सादर करण्यात आली.

- संघटनेचे पदाधिकारी श्री.अमरीश पाथरे यांनी पालघर जि ल्हाधिकारी कार्यालय येथे, ॲड.सुदाम माने यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे तसेच श्री.विजय औटी यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, श्री प्रमो द मसुरकर यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊ न संघटनेतर्फे संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
- महाराष्ट्रातील स्थानिक मराठी युवकांमध्ये वाढती बेरोजगा री ही गंभीर समस्या बनत असताना अनेक ठिकाणी शास न निर्णयांचे उघड उल्लंघन होत असल्याची बाब संघटनेने या निवेदनातून निदर्शनास आणून दिली आहे.
- स्थानिक युवकांना त्यांच्या हक्काचा रोजगार मिळावा शा सन निर्णय केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात प्रभावीप णे राबविण्यात यावा तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
- लवकरच संघटनेचे अध्यक्ष प्रमोद मसूरकर व रोजगार प्र मुख मिलिंद प्रधान यांच्या पुढाकाराने एक शिष्टमंडळ उ द्योग विकास आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या भेटी घेऊन याबाबत चर्चा करण्यात येणार असून शासन निर्णयात का ही दुरुस्त्या सुचविणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रमोद मसूरकर यांनी सांगितले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






