
दीपक ओव्हाळ यांना पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने भव्य सत्कार.
- प्रतिनीधी : परंडा : फारुख शेख :-रिपब्लिकन पार्टी ऑ फ इंडिया (आठवले) पक्षाचे वतीने एका विशेष कार्यक्रमा चे आयोजन करून, डॉ. दीपक ओव्हाळ यांना नुकतीच पीएचडी (Ph.D.) पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अधिकृत पक्ष कार्याल यामध्ये हा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
- रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस माननीय संजय कुमार बनसोडे साहेब यांच्या शुभहस्ते डॉ.दीपक ओव्हाळ सर यांना सन्मानित करण्यात आले.

- यावेळी बनसोडे साहेब यांनी डॉ.ओव्हाळ यांच्या शैक्षणि क यशाचे कौतुक केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस व भावी कारकिर्दीस पक्षाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या.
- उच्च शिक्षण क्षेत्रातील ही कामगिरी समाजासाठी भूषणा वह असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
- या गौरव सोहळ्याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे स्थानिक पदा धिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- यामध्ये प्रामुख्याने रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष दा दासाहेब सर्वदे, माजी तालुकाध्यक्ष फकीर दादा सुरवसे, प्राध्यापक रणदिल सर, प्राध्यापक डॉक्टर चंदनशिवे सर, प्राध्यापक धनवे सर, प्राध्यापक सरवदे सर, अनिल जान राव सर, हरीभाऊ आडाळे, संजीवन भोसले आणि भारत देंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.
- उपस्थित सर्वच मान्यवरांनी डॉ. ओव्हाळ सरांवर अभिनंद नाचा वर्षाव केला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






