जेकटेवाडी येथे तांबे कुटुंबियांनी वडील व चुलत्याच्या स्मृतीप्रित्यर्थ केले वृक्षारोपन; अस्थी विसर्जना ऐवजी लावले आंब्याचे झाड.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- मृत्यूनंतर अस्थींचे नदी किं वा पाण्यात विसर्जन करण्याच्या पारंपरिक रूढीला फाटा देत, परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील तांबे कुटुंबियां नी एक नवा आणि कौतुकास्पद आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
  • आपल्या दिवंगत वडील व चुलत्याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी अस्थी विसर्जनाऐवजी केशर आंब्याचे झाड लावून पर्याव रणपूरक संदेश दिला आहे.
  • जेकटेवाडी येथील कै. महादेव बळीराम तांबे यांचे नुकतेच बुधवार, दिनांक १० जून रोजी निधन झाले.
  • त्यानंतर शुक्रवार, १२ जून रोजी त्यांच्या अस्थी विसर्जना चा कार्यक्रम नियोजित होता.
  • मात्र, तांबे कुटुंबियांनी पारंपरिक पद्धतीने अस्थी पाण्यात विसर्जित करून जलप्रदूषण करण्याऐवजी एक वेगळा आणि पर्यावरणपूरक निर्णय घेतला.
  • पोलिस पाटील रविंद्र तांबे, माजी सरपंच शहाजी तांबे, शि क्षक दिपक तांबे,धोडीबा तांबे,बापू तांबे, गौतम तांबे, बाळू तांबे, सहदेव तांबे, पांडूरंग तांबे, वाल्मीक तांबे आणि क ल्याण तांबे आदी सर्व तांबे बंधूंनी एकमताने निर्णय घेत वडिलांच्या अस्थी घराजवळील शेतात पुरल्या.
  • त्यावर त्यांनी अत्यंत आदराने केशर जातीच्या आंब्याचे रोप लावून अनोख्या पद्धतीने त्यांना श्रद्धांजली वाहिली.
  • या प्रसंगी बोलताना पोलिस पाटील रविंद्र तांबे म्हणाले, “आमच्या वडिलांना शेतीची आणि झाडांची प्रचंड आवड होती.
  • नदीचे पाणी प्रदूषित करण्यापेक्षा वडिलांच्या नावाने लाव लेले हे झाड त्यांची आठवण सदैव जिवंत ठेवेल.
  • या झाडाची फळे पुढील अनेक पिढ्यांना मिळतील आणि वडील या आंब्याच्या रूपाने सदैव आमच्यासोबत राहती ल, अशी आमची भावना आहे.
  • “अस्थी विसर्जनाच्या माध्यमातून होणारे पाण्याचे प्रदूषण टाळून वृक्षारोपण करण्याचा तांबे कुटुंबियांचा हा धाडसी आणि संवेदनशील निर्णय सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरला आहे.
  • तांबे बंधूंच्या या पर्यावरणपूरक कृतीचे जेकटेवाडी व संपू र्ण परंडा पंचक्रोशीतून अत्यंत कौतुक होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles