कुंभेफळ ग्रामपंचायत सदस्यांची हक्काच्या भत्त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव; दोन दिवसांत मानधन देण्याचे बीडिओंचे आश्वासन.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-ग्रामपंचायत सदस्या ना भत्ता मिळत नसल्याने संतप्त झालेल्या कुंभेफळ (ता. परंडा) येथील ग्रामपंचायत सदस्यांनी आज थेट परंडा पं चायत समितीचे येथे परंडा 4 तास ठाम मांडून गटविकास अधिकारी (BDO) गायकवाड यांची भेट घेऊन आपल्या विषयावर चर्चा करून सकारात्मक प्रतिसाद देत गटविका स अधिकाऱ्यांनी येत्या दोन दिवसांत सदस्यांचे प्रलंबित भत्ते वर्ग करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिले आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील मौजे कुंभेफळ येथे सन २०२१ मध्ये ग्राम पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती.
  • या निवडणुकीत लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सद स्यांना गेल्या पाच वर्षांपासून त्यांचा हक्काचा सदस्य भ त्ता (मानधन) मिळालेला नाही.
  • याबाबत सदस्यांनी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा के ला, परंतु त्यांना न्याय मिळाला नव्हता.
  • सततच्या दिरंगाईला कंटाळून अखेर आज, मंगळवार दि नांक १६ जून रोजी कुंभेफळ ग्रामपंचायतीचे सदस्य पद मीन यादव, कौशल्या नरसू नायकोडे आणि आजूम फकी र पठाण यांनी परंडा पंचायत समिती गाठली.
  • सदस्यांनी गटविकास अधिकारी गायकवाड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या हक्काच्या भत्त्याची मागणी लावून धरली.
  • सदस्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर गटविकास अधिकारी गायकवाड यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आ णि “येत्या दोन दिवसांत तुमचे प्रलंबित सदस्य भत्ते खा त्यावर जमा करण्याचे आदेश देतो,” असे ठोस आश्वासन दिले.
  • अनेक वर्षांपासून रखडलेल्या मानधनाचा प्रश्न आता मार्गी लागणार असल्याने सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
  • मात्र, प्रशासनाने दोन दिवसांत शब्द न पाळल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचेही सदस्यांनी सांगितले.
  • या धडक मोर्चामुळे परंडा पंचायत समिती परिसरात का ही काळ चर्चांना उधाण आले होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles