डोणगावातील संशयास्पद उड्डाणांबाबतचा संभ्रम दूर; ड्रोन नसून प्रशिक्षणार्थी विमाने असल्याचे स्पष्ट.

  • प्रतिनिधी : डोणगाव : अंकुश साळुंके :- उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव परिसरात रात्रीच्या वेळी आकाशा त फिरणाऱ्या प्रकाशमान वस्तूंमुळे नागरिकांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
  • या संदर्भात प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीची तात्काळ दखल घेत सलगरवस्ती पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक 17 जून 2026 रोजी घटनास्थ ळी पाहणी करण्यात आली.
  • यावेळी पोलीस कर्मचारी श्री. श्रीशैल माळी तसेच ड्रोन शोध व पडताळणी करणारे तांत्रिक पथक उपस्थित होते.
  • प्रत्यक्ष पाहणी, निरीक्षण व तांत्रिक तपासणीनंतर आका शात दिसणाऱ्या वस्तू ड्रोन नसून प्रशिक्षणासाठी वापर ण्यात येणारी शिकाऊ विमाने असल्याचे स्पष्ट झाले.
  • त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम पूर्णपणे दूर झाला असून भीतीचे वातावरण निवळले आहे.
  • पोलीस प्रशासनाने तक्रारीची तत्परतेने दखल घेऊन वस्तु स्थिती स्पष्ट केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
  • तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद बाबींची माहिती त्वरित प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles