
परंडा येथील काळामारुती मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा येथील प्रसि द्ध काळामारुती मंदिराचा भव्य कलशारोहण सोहळा नुक ताच अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला.
- मंदिर शिखरावरील हा भव्य कळस सुजितसिंह व संतोष सिंह ठाकूर (करमाळकर) यांनी देणगी स्वरूपात अर्पण केला आहे.

- या धार्मिक सोहळ्याची सुरुवात १६ जून रोजी झाली. सं तोषसिंह ठाकूर यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथून आणलेल्या या पवित्र कळसाची मंडई पेठेतील त्यांच्या निवासस्थानापासून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
- ही मिरवणूक मुख्य मार्गावरून राममंदिर आणि तेथून भ वानीशंकर मंदिर येथे आणण्यात आली.
- यानंतर १७ जून रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मंदिरा म ध्ये विधिवत होमहवन, धार्मिक विधी आणि विशेष पूजन करण्यात आले.

- दुपारी ठीक २ वाजता मंत्रोच्चाराच्या जयघोषात मंदिरा च्या शिखरावर कलशारोहण सोहळा पार पडला.
- या मंगलमयी प्रसंगी उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर, शिवसेनेचे युवा नेते विश्वजित पाटील, ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे, केशरसिंह देवीसिंह ठाकूर, विश्वजितसिंह संतोष ठाकूर आणि ओमकरणसिंह परदेशी यांच्यासह मं दिर परिसरातील शेकडो भाविक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- कलशारोहणानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामुळे परंडा परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






