परंडा येथे पोलीस उपनिरीक्षक गजानन मुळे यांचा नामदेव शिंपी समाजाच्या वतीने नागरी सत्कार.

  • प्रतिनीधी : परंडा : फारुख शेख :- येथील रहिवासी गजानन शंकरराव मुळे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल नामदेव शिंपी समाजाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
  • या यशामुळे मुळे कुटुंबियांसह संपूर्ण परंडा तालुक्याचे नाव राज्यपातळीवर रोमारोम झाले आहे.
  • त्यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
  • त्यांच सत्कार सोहळा उत्साहात पार पडला गजानन मुळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलीस उपनिरी क्षक पदाला गवसणी घातली आहे.
  • त्यांच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी आयोजित सत्कार सोहळ्यात समाजातील मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
  • यावेळी उपस्थितांनी गजानन मुळे यांच्या भावी वाटचाली स आणि पोलीस सेवेतील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.मा न्यवरांची उपस्थितीयाप्रसंगी समाजातील ज्येष्ठ व तरुण मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • यामध्ये प्रामुख्याने:एडव्होकेट अनंत राशिनकरधोंडीराम बुलबुलेधनंजय बुलबुलेज्ञानेश्वर बुलबुलेसागर बुलबुलेमयूर बुलबुलेअनंत दीक्षितअमित राशिनकरयांच्यासह नामदेव शिंपी समाजातील अनेक प्रमुख पदाधिकारी,युवक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • गजानन मुळे यांच्या यशामुळे तरुण पिढीला मोठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी व्यक्त केला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles