
राजापूर रोड रेल्वे स्थानकात लिफ्टच्या कामाला सुरुवात, प्रवाशी वर्गात समाधान.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- कोकण रेल्वे मार्गा वरील राजापूर तालुक्यातील एकमेव महत्त्वाचे स्थानक अ सलेल्या राजापूर रोड रेल्वे स्थानकात मंजूर झालेल्या लि फ्टच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे.
- खोलगट भागात वसलेल्या या स्थानकावर प्रवाशांना दररो ज चढ-उतार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
- आता लिफ्टचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये स माधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- राजापूर रोड स्थानकाच्या भौगोलिक रचनेमुळे ज्येष्ठ नाग रिक, महिला, दिव्यांग तसेच आजारी प्रवाशांना सामाना सह ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
- त्यामुळे स्थानकात लिफ्टची सुविधा उपलब्ध करून दे ण्याची मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने होत होती. या मागणीसाठी पंचक्रोशी ग्रामविकास समितीने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.
- समितीचे प्रशासकीय प्रमुख आदिनाथ कपाळे यांनी कोक ण रेल्वे प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करून हा प्रश्न मा र्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.
- त्यांच्या प्रयत्नांना यश येत सुमारे ६० लाख रुपयांच्या नि धीतून लिफ्ट उभारणीस मंजुरी मिळाली. निविदा प्रक्रिया ही पूर्ण झाली होती.
- मात्र प्रत्यक्ष काम सुरू होण्यास काहीसा विलंब झाल्याने प्रवाशांमध्ये उत्सुकता कायम होती.
- अखेर कोकण रेल्वे प्रशासनाने लिफ्ट उभारणीच्या कामा ला प्रारंभ केला असून सध्या बांधकाम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांसाठी आधुनिक लिफ्ट सुविधा उपलब्ध होणार आहे.
- राजापूर रोड रेल्वे स्थानकावर कोकणकन्या एक्स्प्रेस,तुता री एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, दिवा – सा वंतवाडी पॅसेंजर तसेच उधना आणि मडगाव-नागपूर यां सारख्या महत्त्वाच्या गाड्यांना थांबा असल्याने येथे दररो ज मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते.
- त्यामुळे लिफ्टची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुखकर होणार आहे.
- दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या मागणीची आता प्रत्यक्ष पूर्तता होत असल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त कर ण्यात येत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






