
उपजिल्हा रुग्णालयात पल्स पोलिओ मोहिमेचा थाटात शुभारंभ.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा येथील उपजि ल्हा रुग्णालयामध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ रविवारी अत्यंत उत्साहात करण्यात आला.
- ‘दोन थेंब आयुष्याचे’ या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओचे डोस देऊन या मोहिमेची सुरुवात झाली.
- याप्रसंगी नगरसेवक वाजीत दखनी आणि आरोग्य समि तीचे अध्यक्ष बालाजी नेटके यांच्या प्रमुख उपस्थितीत बा लकांना पोलिओ डोस पाजण्यात आला.

- कार्यक्रमाला परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकी य अधीक्षक डॉ.जुबेर मोमीन आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.अब्रार पठाण यांची विशेष उपस्थिती होती.
- या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी आशिष गाळणे यांच्या सह आरोग्य पथक विशेष परिश्रम घेत आहे.
- तालुक्यातील जास्तीत जास्त बालकांनी या मोहिमेचा ला भ घ्यावा, असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि वैद्यकीय प्रशासनाने केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






