
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या ‘फिनिक्स’ पक्ष्यांचा ‘वर्षा’वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव..!
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :-संकटांवर मात करून शिक्षणा च्या बळावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या भारतीय जै न संघटना (BJS) संचालित वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाच्या (WERC) माजी विद्यार्थ्यांचा गौरव नुकताच एका विशेष सोहळ्यात करण्यात आला.
- महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानी हा भावूक आणि प्रेरणा दायी अभिनंदन सत्कार सोहळा २४ जून २०१६ रोजी अ त्यंत उत्साहात संपन्न झाला.

- वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाच्या गेल्या ३२ वर्षां च्या दैदिप्यमान प्रवासात लातूरचे भूकंपग्रस्त, अनाथ, शेत करी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील तसेच आदिवासी समा जातील हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले.
- आज हे विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करून समाजात मानाचे स्थान मिळवत आहेत.
- याच यशस्वी विद्यार्थ्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जी वनप्रवासावर आधारित श्री.पद्माकर गोरे लिखित ‘फिनि क्स (यशोगाथा)’ या पुस्तकाचे प्रकाशन या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
- “प्रतिकूल परिस्थितीवर केवळ शिक्षणाच्या आणि जिद्दी च्या बळावर मात कशी करता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे हे विद्यार्थी आहेत.
- या विद्यार्थ्यांची बदललेली जीवनगाथा समाजासाठी नेह मीच दीपस्तंभासारखी काम करेल,” असा सूर याप्रसंगी उमटला.
- या सोहळ्याला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, दिव्यज फाउंडेशनच्या संस्थापक श्रीमती अमृ ता फडणवीस, भारतीय जैन संघटनेचे (BJS) संस्थापक श्री.शांतिलाल मुथ्था, कु. दिविजा फडणवीस, श्री.विलास राठोड आणि BJS च्या मैनेजिंग डायरेक्टर कोमल जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
- शिक्षणाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या WERC च्या या शैक्ष णिक पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
- हजारो वंचित आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कला टणी देणारे हे अवाढव्य सेवाकार्य यशस्वीरीत्या पूर्ण पार पाडण्यात श्री.पंडित राठोड आणि श्री.संचित यादव यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण व मोलाचे सहकार्य लाभले.
- हा सोहळा केवळ सत्कार सोहळा न राहता, संघर्षातून य शाकडे गेलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा एक अभूतपूर्व उत्सव ठरला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






