
वढू खुर्द येथे 325 बालकांचे पोलिओ लसीकरण,संपन्न उद्या होणाऱ्या वटपौर्णिमेसाठी सरपंचांचा अनोखा उपक्रम.
- प्रतिनिधी : ज्ञानदेव गांडूळे :- वढू खुर्द, ता.तालुका : येथे आज सरपंच महेंद्र दादा खांदवे यांच्या उपस्थितीत पोलि ओ लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.

- यावेळी गावातील 325 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांनी परिश्रम घेतले.

- याचवेळी सरपंच खांदवे यांनी उद्या होणाऱ्या वटपौर्णिमे च्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम जाहीर केला.

- महिलांना पूजेसाठी वणवण फिरावे लागू नये म्हणून गा वातील प्रत्येक कॉलनीमध्ये वडाच्या कुंड्या उपलब्ध करू न देण्यात येणार आहेत. ग्रामस्थांनी सरपंचांच्या या दोन्ही उपक्रमांचे कौतुक केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






