वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांना रायगड मी मराठी प्रतिष्ठानने दिला आधाराचा हात.

  • प्रतिनिधी : मंडणगड : प्रमोद तरळ :- आयुष्यातील स र्वात मोठा आधार म्हणजे वडील. त्यांच्या छत्रछायेत मुलां चे बालपण सुरक्षित, निर्धास्त आणि स्वप्नांनी भरलेले असते.
  • परंतु नियतीच्या कठोर आघातामुळे काही चिमुकल्यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र कायमचे हरवते. त्या कोवळ्या वयात त्यांच्या डोळ्यांत असंख्य प्रश्न असतात, तर मनात भविष्याची चिंता.
  • अशा मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण बनून उभे राहि ले आहे रायगड मी मराठी प्रतिष्ठान तसेच प्रतिष्ठानचे सं स्थापक श्री.आदेश लाड यांनी समाजाप्रती असलेली आ पली बांधिलकी जपत कु.साईराज दिनेश राणे आणि कु. खुशी दिनेश राणे (मु.आतले, पो.देव्हारे, ता.मंडणगड, जि. रत्नागिरी ) या मुलांना दत्तक स्वरूपात स्वीकारले आहे.
  • केवळ सहानुभूती व्यक्त न करता त्यांच्या शिक्षणाचा प्रवा स खंडित होऊ नये यासाठी दरवर्षी त्यांना शालेय किट देण्यात येते.
  • प्रतिष्ठानचे सक्रिय सदस्य श्री. दर्शन पवार जबाबदारी स्वीकारून दरवर्षी या मुलांपर्यंत किट पोचवतात.
  • प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही कु.साईराज आणि कु. खुशी राणे यांना किट देण्यात आले यावेळी मुलांची आई,आतले गा वचे कु. प्रेम राणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles