
करमाळा बंद पडणाऱ्या एसटीची विद्यार्थिनींकडून लिंबू-मिरचीने नजर उतरवत अनोखे आंदोलन.
- प्रतिनिधी : करमाळा : :- दि. १५ जुलै तालुक्यातील कर माळा-कर्जत मार्गावरील एसटी बस सेवेच्या अनियमितते ला कंटाळून शाळकरी विद्यार्थिनींनी आज अनोख्या पद्ध तीने निषेध व्यक्त केला.
- वारंवार बंद पडणाऱ्या एसटी बसला लिंबू-मिरची बांधून तिची प्रतीकात्मक नजर उतरवत त्यांनी एसटी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
- करमाळा-कर्जत हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अ त्यंत महत्त्वाचा मार्ग आहे.
- या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणा साठी करमाळा, कर्जत आणि इतर ठिकाणी प्रवास करतात.

- मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर धावणाऱ्या एस.टी बसेस जुन्या, नादुरुस्त असल्याने ऐनवेळी बंद पड ण्याच्या घटना वाढल्या आहेत.
- कधी बस वेळेवर येत नाही, तर कधी भर रस्त्यात बस बंद पडल्याने विद्यार्थ्यांना तासन्तास उन्हात थांबावे लागते.
- त्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये उशिरा पोहोचणे, परीक्षेला मु कणे आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
- या त्रासाला वाचा फोडण्यासाठी आज सकाळी विद्यार्थि नींनी एकत्र येत बस स्थानकात उभ्या असलेल्या एका एस.टी बसला लिंबू-मिरचीचा तोरण बांधला आणि “दृष्ट काढण्याचा” विधी केला.
- यावेळी बोलताना विद्यार्थिनी प्रतिष्ठा शिंदे म्हणाली, “आ म्ही दररोज वेळेवर शाळेत जाण्यासाठी धडपड करतो, पण एसटीच वेळेवर येत नाही.
- बस बंद पडली की आमचे शिक्षण बंद पडते. शासनाने आ मच्या अडचणीची दखल घेऊन या मार्गावर नवीन आणि नियमित बस सेवा सुरू करावी. आम्हाला फक्त शिक्षण हवे आहे, संघर्ष नको.”
- या अनोख्या आंदोलनाची चर्चा सध्या संपूर्ण तालुक्यात होत असून सोशल मीडियावरही फोटो-व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
- नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या या मागणीला पाठिंबा दिला आहे. “लिंबू-मिरचीने नजर उतरवणे हा अंधश्रद्धा नाही, त र प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केलेला एक मार्मिक टोला आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक प्रवाशांनी दिली.
- आता तरी एसटी महामंडळ जागे होऊन करमाळा-कर्जत मार्गावरील बस सेवा सुरळीत करणार का, याकडे सर्व वि द्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.
- नव्याने करमाळा आगारामध्ये हजर झालेले आगार व्यव स्थापक प्रमोद शिंदे लक्ष घालणार का.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






