
परंडा शहरात आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला पालखी मार्गाचे काँक्रिटीकरण पूर्ण; नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर यांच्याकडून ४ दिवसांत रस्त्याचे काम फत्ते.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- आषाढी वारीच्या पार्श्वभूमी वर परंडा शहरातून मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे.
- गेल्या अनेक वर्षांपासून खराब रस्त्यामुळे होणारा वारक ऱ्यांचा त्रास आता कायमचा मिटला असून, नगराध्यक्ष जा कीर भाई सौदागर यांच्या विशेष पुढाकारातून ‘जय भवा नी चौक ते खासापुरी चौक’ या मुख्य पालखी मार्गाचे सि मेंट काँक्रिटीकरण अवघ्या चार दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे.

- या धडाकेबाज कामगिरीमुळे वारकऱ्यांसह परंडावासीयां कडून नगराध्यक्षांचे कौतुक होत आहे.
- अनेक वर्षांची अडचण मिटलीआषाढी एकादशीनिमित्त पै ठणहून पंढरपूरकडे निघणारी संत एकनाथ महाराजांची पालखी, तसेच भगवानगड, आपेगाव आणि इतर भागांतू न येणाऱ्या शेकडो वारकरी पालख्या परंडा शहरातून मा र्गस्थ होतात.
- मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरील रस्त्याची दुर वस्था झाली होती. खड्डे आणि धुळीमुळे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना, वृद्धांना आणि महिलांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता.
- ही गंभीर समस्या लक्षात घेऊन यावर्षी प्रशासनाने युद्धपा तळीवर पावले उचलली.
- रात्रंदिवस काम करून ४ दिवसांत रस्ता पूर्णपालखी शह रात प्रवेश करण्यापूर्वी हा रस्ता सुसज्ज व्हावा, यासाठी नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर यांनी स्वतः रस्त्याच्या कामावर लक्ष केंद्रित केले.
- जय भवानी चौक ते खासापुरी चौक या मुख्य मार्गाचे का म रात्रंदिवस, २४ तास मजूर आणि अत्याधुनिक यंत्रसाम ग्री लावून करून घेण्यात आले.
- कंत्राटदार आणि पालिकेच्या अभियंत्यांना सोबत घेऊन के वळ ४ दिवसांत दर्जेदार सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला.
- जागो जागी मुरूम टाकून घेतले . वारकरी आणि नागरि कांकडून कौतुकाचा वर्षावआता हा रस्ता पूर्णपणे चकाच क आणि वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे.
- खराब रस्त्यांच्या त्रासातून मुक्तता झाल्यामुळे पैठण, आपे गाव व भगवानगडून येणाऱ्या दिंड्यांमधील वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

- ऐन वारीच्या तोंडावर वारकऱ्यांची माऊलीसारखी सेवा क रणाऱ्या नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर आणि परंडा नग रपालिकेच्या या तत्परतेचे संपूर्ण तालुक्यातून आणि प्रिंट मीडियासह सामाजिक माध्यमातून जोरदार कौतुक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






