परंडा-मुंगशी पालखी मार्ग २ दिवसात दुरुस्त करा, अन्यथा ‘मनसे’ स्टाईल आंदोलन!जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे शहर अध्यक्ष नवनाथ कसबे . यांचा प्रशासनाला थेट इशारा;

  •  प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- संत एकनाथ महा राज पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेप ला असतानाच, परंडा ते मुंगशी या पालखी मार्गाची प्रचंड दुरवस्था झाल्याचे समोर आले आहे.
  • रस्त्यावरील खड्डे, चिखल आणि दुरवस्थेमुळे पायी चाल णाऱ्या हजारो वारकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
  • या गंभीर समस्येची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) प्रशासनाला धारेवर धरले असून, २ दिवसांत रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र ‘मनसे’ स्टाईल आंदोलन छेडण्या चा इशारा दिला आहे.
  • या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष आबासाहे ब गणपत ढवळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सार्व जनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री. शिंदे यांची भेट घेऊन त्यांना रस्ता दुरुस्तीचे निवेदन दिले.
  • या भेटीदरम्यान, अभियंता शिंदे यांनी पुढील २ दिवसांत रस्त्याची तात्पुरती का होईना, पण दर्जेदार दुरुस्ती करून घेण्याचे तोंडी आश्वासन मनसे पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
  • “वारकरी हा आपला बाप आहे, त्याचा छळ सहन करणार नाही”या प्रसंगी बोलताना मनसे जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे आक्रमक पवित्र्यात दिसले. ते म्हणाले, “वारकरी हा आपला बाप आहे.
  • दरवर्षी श्रद्धेने आणि कष्टाने पायी चालणाऱ्या या माऊलीं ना जर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चिखल आणि खड्ड्यांतून चालवे लागणार असेल, तर मनसे ते अजिबा त खपवून घेणार नाही. आम्ही प्रशासनाला २ दिवसांची मुदत दिली आहे.
  • या काळात पालखी मार्ग सुसाट झाला नाही, तर मनसे आपल्या स्टाईलने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.
  • यानंतर होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल.”पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने युद्धपात ळीवर काम सुरू करावे, अशी मागणी आता मनसे आणि स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles